________________
पैशांचा व्यवहार
खुशाल चढून जातो. चढताना असा पकडून-पकडून जोरात चढतो, पण उतरताना मांजर कसे मडक्यात तोंड खुपसते, जोर लावून खुपसते आणि मग परत काढताना कशी अवस्था होते? तसे घडते.
हे धान्याचे बी सुद्धा तीन-पाच वर्षात निर्जीव होऊन जाते, नंतर उगवत नाही.
पूर्वीतर लक्ष्मी पाच पिढ्यांपर्यंत टिकायची, तीन पिढ्यांपर्यंत तर टिकायचीच. आणि आता तर एक पीढी सुद्धा टिकत नाही, माणसाच्या हयातीत येते आणि त्याच्या हयातीतच निघून सुद्धा जाते. एक पीढी सुद्धा टिकत नाही, अशी ही लक्ष्मी आहे. ही तर पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी आहे. त्यात थोडी पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी असते, ती तुम्हाला येथे (दादाजींच्या सत्संगात) येण्याची प्रेरणा देते, आमच्याशी भेट घालून देते आणि येथे तुम्हाला खर्चही करायला लावते. सन्मार्गाने लक्ष्मी वापरली जाते. नाहीतर हे सर्व धूळीतच जायचे. सगळं गटारातच जाणार. ही मुले आपण मिळविलेल्या लक्ष्मीचाच उपभोग करतात ना, आपण मुलांना म्हटले की तुम्ही माझ्या लक्ष्मीचा उपभोग करता. तर ते म्हणतात, 'तुमची कसली? आम्ही आमच्याच लक्ष्मीचा उपभोग करतोय' असे म्हणतात. म्हणजे गटारातच गेले ना सगळे !
या जगाला यथार्थपणे, 'जसे आहे तसे' समजता आले तर जीवन जगण्यासारखे आहे, यथार्थ जाणून घेतले तर संसारीक चिंता, उपाधी होणार नाहीत. तेव्हा मग जीवन जगण्यासारखे वाटेल!
___ (२)
लक्ष्मीशी जुळलेला व्यवहार श्रीमंती काय केल्याने मिळू शकते? लोकांना अनेक प्रकारे मदत केली असेल, तेव्हा लक्ष्मी आपल्या घरी येते ! नाहीतर लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी तर देण्याची इच्छा असेल त्यांच्याकडेच येते. जो दुसऱ्यांसाठी झिजतो, स्वत:ची फसवणूक पण होऊ देतो, नोबिलिटी ठेवतो, त्याच्याकडे