________________
पैशांचा व्यवहार
लक्ष्मी येते. लक्ष्मी निघून गेली असे वाटते खरे, पण परत होती तिथेच येऊन उभी राहते.
पैसे कमविण्यासाठी पुण्याची गरज आहे. बुद्धीच्या जोरावर पैसे मिळविण्यासाठी धडपड केल्याने तर उलट पाप बांधले जाते. माझ्यात बुद्धी नाही म्हणून पाप बांधले जात नाहीत. आमच्यात (दादाश्री) बुद्धी एक परसेन्टही नाही!
दयाळू, दुसऱ्याचा विचार करणारा स्वभाव माझा! वसुली करण्यासाठी जायचे झाले तर तिथे उलट पैसे देऊन येईन!!! तसे तर वसुली करण्यासाठी कधी जातच नव्हतो. पण कधी जायचे झाले, आणि त्या दिवशी ते अडचणीत असतील तर उलट त्यांना देऊन परत येईन. माझ्या खिशात उद्याच्या खर्चासाठी काही ठेवले असतील तर तेही देऊन येईन. आणि दुसऱ्या दिवशी खर्च करताना हात आखडून राहायचा. असे माझे जीवन व्यतीत झाले आहे.
प्रश्नकर्ता : जास्त पैसे झाले की माणूस मोहात अडकतो, असेच ना? जास्त पैसे असणे म्हणजे ते दारु सारखेच आहे, नाही का?
दादाश्री : प्रत्येकाची नशा चढते. जर नशा चढत नसेल तर पैसे जास्त झाले तरी हरकत नाही. पण नशा चढली की झाला दारुड्या, मग त्या खुमारीतच भरकटत असतात लोकं! इतरांचा तिरस्कार करतात, 'हा गरीब आहे, असा आहे, तसा आहे.' आला मोठा श्रीमंत, लोकांना गरीब म्हणणारा! स्वतः श्रीमंत! माणसाला गरीबी केव्हा येईल हे सांगता येत नाही. तुम्ही म्हणता तसेच आहे! नशा वाढत असते.
आयुष्यभर जगातील लोक पैशांच्या मागेच लागले आहेत. आणि पैशांनी तृप्त झाला असेल, असा एकही मनुष्य मी पाहिला नाही. तर मग हे सर्व गेले कुठे?
अर्थात् ही सर्व थापेबाजीच चालत आहे. धर्माचे एक अक्षरही समजत नाहीत आणि सगळे असेच चालत राहते. म्हणून जेव्हा संकट येऊन ठेपते, तेव्हा काय करावे हे त्यांना कळतच नाही. डॉलर येऊ