________________
पैशांचा व्यवहार
२७
लागले की उड्या मारत राहील. पण अडचण पडली की मार्ग कसा काढायचा ते समजत नाही. त्यामुळे निव्वळ पापाचीच शिदोरी बांधतो. त्या वेळेला पाप न बांधता वेळ कशी निभावून घ्यावी इतके समजले तर तोच धर्म आहे.
नेहमी सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, हा जगाचा नियम आहे. तर हा कर्मोदय होतो तेव्हा पैसे आपोआपच वाढत जातात सर्व प्रकारे गाड्या-बीड्या, बंगले, वाढत जातात. सगळेच वाढत जाते. पण जेव्हा चेन्ज होतो तेव्हा सगळे विखुरले जाते. आधी जमा होते नंतर विखुरले जाते त्यावेळी शांती टिकवून असावे, हा सर्वात मोठा पुरुषार्थ!
सख्खा भाऊ पन्नास हजार डॉलर परत करत नाही. अशा परिस्थितीत जीवन कसे व्यतीत करायचे हा पुरुषार्थ म्हणायचा. सख्ख्या भावाने पन्नास हजार डॉलर घेतलेले परत दिले नाही आणि वरुन शिव्या दिल्या. अशा परिस्थितीत जीवन कसे जगावे, हा पुरुषार्थ आहे.
आणि जर एखाद्या नोकराने, ऑफिसातून दहा हजाराचा माल चोरी केला. तिथे कसे वर्तन करावे हा पुरुषार्थ आहे. नाहीतर अशावेळी योग्य समज नसल्यामुळे सर्वकाही धुळीत मिळून जाते आणि स्वत:चा जन्म वाया जातो.
प्रश्नकर्ता : आपल्या आप्तवाणीत सांगितलेलेच आहे ना की 'तू जर कुणाला हजार-दोन हजार रुपये देतोस, तर ते कशाला देतोस? ते तू तुझ्या अहंकारासाठी आणि मानासाठी देतोस.
दादाश्री : मान विकला त्याने. त्याने 'अहंकार' विकला तर तो आपण घ्यायला हवा. आपण खरीदावा. मी तर आयुष्यभर अहंकाराची खरेदी करत होतो. अहंकार विकत घ्यावा.
प्रश्नकर्ता : म्हणजे काय दादा?
दादाश्री : तुमच्याजवळ पाच हजार मागायला आला, त्याच्या डोळयात लाज दिसते की नाही?!