________________
२
.
पैशांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : मागतो त्यावेळी तो लाज सोडून आपल्याला 'अहंकार' विकतो. तर आपण तो खरीदावा. जर आपल्याजवळ शिल्लक असेल तर!
पैसे मागायला जाणे बरे वाटते? सख्ख्या काकाजवळ मागायला जाणे सुद्धा आवडेल का? का नाही आवडत? अरे, नातेवाइकाकडे मागायला सुद्धा आवडत नाही. वडिलांजवळ मागायला पण आवडत नाही. हात पसरायला नकोसे वाटते.
प्रश्नकर्ता : त्याचा अहंकार आपण विकत घेतला. पण त्याचा अहंकार आपल्या काय कामाचा?
दादाश्री : ओहोहो! त्याचा अहंकार विकत घेतला. म्हणजे त्याच्यात ज्या शक्ति आहेत त्या आपल्यात प्रकट झाल्या! तो बिचारा अहंकार विकायला आला.
प्रश्नकर्ता : हात-पाय चांगले असताना सुद्धा कुणी जर भीक मागू लागला, तर त्याला दान देण्यास मनाई करणे हा गुन्हा आहे का? ।
दादाश्री : दान दिले नाही त्यास हरकत नाही, पण तुम्ही जर त्याला म्हणालात की, 'असा रेड्यासारखा धष्टपुष्ट असून सुद्धा हे असे का करतोस? असे आपण म्हणता कामा नये. तुम्ही सांगा की 'बाबा, मी देऊ शकत नाही.'
समोरच्या माणसाला दु:ख होईल असे आपण बोलूच नये. वाणी अशी गोड असावी की ज्याने समोरच्या माणसाला सुखद वाटेल. वाणी हे तर सर्वात मोठे धन आहे आपल्याजवळ. दुसरे धन तर टिकेल किंवा नाही सुद्धा टिकणार, पण वाणीचे धन हे सदैव टिकणारे असते. तुम्ही चांगले शब्द बोललात, तर समोरच्या माणसाला आनंद होईल. तुम्ही त्याला पैसे नाही दिले तरी हरकत नाही, पण चांगले गोड शब्द बोला ना!
इथे मोठा बंगला बांधला तर तुम्ही जगाचे भिकारी बनाल. छोटा बंगला तर जगाचे तुम्ही राजे! कारण हे पुद्गल(जे पुरण आणि गलन