________________
पैशांचा व्यवहार
होते) आहे. हे पुद्गल जर वाढले तर आत्मा (प्रतिष्ठित आत्मा) हलका होऊन जातो. आणि पुद्गल हलके झाले तर आत्मा जड होतो. या संसारचे दुःख जे आहे, ते आत्म्याचे विटामिन आहे. आणि जे सुख आहे, ते देहाचे विटामिन आहे.
रुपयाचा स्वभाव नेहमीच कसा असतो? चंचल, म्हणून तुम्ही दुरुपयोग होणार नाही अशा पद्धतीने त्याचा सदुपयोग करावा. त्याला स्थिर राहू देऊ नका. ही संपत्ति किती प्रकारची म्हणायची? तेव्हा म्हणे स्थावर (अचल) आणि जंगम(चल). जंगम संपत्ति म्हणजे हे रुपये, डॉलर्स इत्यादी, आणि स्थावर म्हणजे हे घर इत्यादी. पण त्यातही स्थावर संपत्ति ही जास्त टिकते. आणि जंगम म्हणजे रोकडे डॉलर्स वगैरे जे असतात, ते तर जाण्याच्या मार्गाचेच समजा ना. अर्थात् रोकडचा स्वभाव कसा आहे? तर दहा वर्षानंतर अकराव्या वर्षी टिकत नाही. नंतर सोन्याचा स्वभाव तो चाळीस-पन्नास वर्षे टिकण्याचा आहे. आणि स्थावर मिळकतीचा स्वभाव शंभर वर्षे टिकण्याचा आहे. अर्थात् सर्वांचा मुदत काळ हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. पण शेवटी तर सर्व जाणारच आहे. त्यामुळे हे सर्व समजून-ऊमजून करावे. हे व्यापारी पूर्वी काय करायचे, रोकडे पैसे पंचवीस टक्के व्यापारात, पंचवीस टक्के, व्याजावर ठेवत होते, पंचवीस टक्के सोन्यात आणि पंचवीस टक्के घरासाठी गुंतविणार. अशा प्रकारे आपल्या मुद्दलाची व्यवस्था करीत असत. फार हुशार लोक! या काळात तर मुलांना असे काही शिकवलेलेही नसते. कारण या काळात तेवढी मुद्दलच उरत नाही, तर शिकवणार काय?
या पैशांचे काम असे आहे की अकराव्या वर्षी पैसा नाश पावतो, नेहमीच, दहा वर्षांपर्यंतच चालतो. तर ही खऱ्या पैशांची गोष्ट. समजलात ना? खोट्या पैशांची तर गोष्टच वेगळी! खरे धन ते अकराव्या वर्षी संपते !
प्रश्नकर्ता : शेयर बाजारात सट्टाबाजी करणे चांगले की सोने घेतलेले बरे!
दादाश्री : शेयर बाजारात तर जाऊच नये. शेयर बाजारात तर खेळाडू लोकांचेच काम. मधले सर्व तर फार अडचणीत सापडतात. यात