________________
३०
पैशांचा व्यवहार
तर खेळाडूचाच फायदा होतो! पाच-सात मुख्य खेळाडू मिळून भाव ठरवून टाकतात. त्यामुळे मधल्या लोकांची वाट लागते! पण यात कुणाचा तरी फायदा होतोच ना! तर यात मोठ्या खेळाडूंचा फायदा होतो, कारण ते रात्रंदिवस हेच करत असतात ना! हे मधले लोक जे इथून कमावून तिथे टाकतात, ते सर्वच मारले जातात. आणि छोटे लोक जे झेप घेऊ शकत नाहीत त्यांचा खर्च जेमतेम निघतो. म्हणून आमच्या नातेवाईकाने जेव्हा मला विचारले, तेव्हा मी त्यांना सांगितले की तुम्ही तर यात पडूच नका.
प्रश्नकर्ता : दादाजी, आपले अमेरिकन महात्मा विचारतात की आम्ही जी थोडीफार कमाई केली आहे, ती घेऊन इंडियाला परतावे का? मुलांची विशेष काळजी वाटते, कारण हवे तसे संस्कार त्यांना इथे मिळत नाहीत.
दादाश्री : होय, हे सर्व तर खरे आहे. इथे जर पुरेसे पैसे कमावून घेतले असतील तर आपण आपल्या घरी, इंडियाला परत यावे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे.
प्रश्नकर्ता : आपण म्हणालात की पैसे कमावून घेतले की निघून जावे, परंतु पैशांची तर काही लिमीट नसते, त्यामुळे आपण अशी काही लिमीट आखून द्या. सांगा की इतकी लिमीट झाली की पैसे घेऊन आम्ही इंडियाला परत जाऊ.
दादाश्री : होय, हिंदुस्तानात तुम्हाला काही धंदा-रोजगार करायचा असेल, तर त्यासाठी काही भांडवल वगैरे लागेल, तेव्हा व्याजाने पैसे घ्यायची पाळी येऊ नये अशी व्यवस्था करावी. थोडेफार बँकेकडून घ्यावे लागले तर ठीक आहे. बाकी कुणी उधार देणार नाही. तिथे तर कुणी उधार देत नाही, पण इथे अमेरीकेतही कोणी देणार नाहीत, बँकच उधार देईल. म्हणजे तेवढे सोबत घेऊन यायचे. बिझनेस तर करावाच लागेल ना, तिथेही खर्च तर काढावा लागणार ना! पण तिथे इंडियात मुले खूप चांगली होतात. इथे डॉलर मिळतात, पण संस्कारांची कमतरता आहे ना! ___ अमेरीकेत आम्हाला मोठ्या दुकानात घेऊन जातात. म्हणतात, चला दादाजी. तर दुकान बिचारे आमच्या पाया पडत राहते, की धन्य