________________
पैशांचा व्यवहार
आहे! जरा सुद्धा दृष्टी बिघडवली नाही आमच्यावर! संपूर्ण दुकानातल्या कोणत्याही वस्तूवर दृष्टी बिघडवली नाही! आमची दृष्टी बिघडणारच नाही ना. आम्ही पाहतो सर्व पण आमची दृष्टी बिघडत नाही. आम्हाला कुठल्याही वस्तूची काय गरज? मला कोणत्याही वस्तूचा खपच नाही ना! तुझी दृष्टी तर बिघडते ना!
प्रश्नकर्ता : आवश्यकता असेल ती वस्तू घ्यावी लागते.
दादाश्री : आमची दृष्टी बिघडत नाही. दुकान आम्हाला असे नमस्कार करीत राहते, की असा पुरष पाहिलाच नाही कधी! पुन्हा तिरस्कारही नाही. फर्स्ट क्लास, रागही नाही, द्वेषही नाही. काय म्हटले? वीतराग! आले वीतराग भगवंत!
एक महात्मा विचारतात की शेयर बाजाराजाचे कामकाज मी बंद करावे की सुरू ठेवावे? मी म्हटले बंद करून टाका. आतापर्यंत जेवढे केले तेवढे पैसे खेचून घ्या, पण आता मात्र बंद करायला हवे. नाहीतर अमेरीकेत आला काय आणि गेला काय, सारखेच होईल! होते तसेच्या तसे. रिकामे खिसे घेऊन घरी जावे लागेल.
व्याज घेण्याच्या व्यापारात पडलेला मनुष्य, हा मनुष्य मिटून कोण बनेल, हे केवळ देवालाच माहित! तुम्ही बँकेत ठेवलेत तर हरकत नाही, दुसऱ्या कुणाला उधार दिलेत तरी हरकत नाही, पण व्याज खाण्याच्या नादी लागला, तो दोन टक्के, दीड टक्के, सव्वा टक्के, अडीच टक्केच्या भट्टीत पोळत राहतो. अशा माणसाचे पुढे काय होईल ते सांगता येत नाही. सध्या मुंबईत सर्वांचीच अशी स्थिती झालेली आहे.
___ व्याज घेण्यास हरकत नाही, पण हा तर व्याज घेण्याचा व्यापारच सुरु करतो, धंदाच व्याज खाण्याचा. तुम्ही काय करायला हवे? ज्याला व्याजाने दिले त्याला सांगावे की बँकेत जितके व्याज देतात तितके व्याज तुम्ही मला द्यावे लागेल. आणि तरीही समजा एखाद्या माणसाजवळ व्याज देण्याची ऐपत नाही, मुद्दल सुद्धा नाही, तर तिथे मौन राहावे. त्याला दु:ख होईल असे वर्तन करू नये. आपले पैसे बुडाले असे समजून चालवून घ्यायचे. समुद्रात पडले, तर त्याचे काय करता येईल?