________________
3
पैशांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : जर सरकार एबाव नॉर्मल टॅक्स थोपत असेल, तर नोर्मेलिटी आणण्यासाठी लोक टॅक्सची चोरी करतात, तर त्यात काय चुकीचे आहे ?
दादाश्री : लोभी माणसाचा लोभ कमी करण्यासाठी टॅक्स ही उत्तम वस्तू आहे.
लोभी माणसाचे कसे असते की पाच करोड झाले तरी मरेपर्यंत त्याला संतोष होत नाही. तेव्हा मग वरच्यावर असा दंड मिळतो, त्यामुळे तो मागे वळतो, म्हणून ही तर चांगली गोष्ट आहे. इन्कमटॅक्स कशास म्हणायचा? जर पंधरा हजाराहून अधिक कमावत असेल तर. पंधरा हजारापर्यंत तर ते लोक सोडतात बिचारे, मग त्या पंधरा हजारात एका छोट्या कुटुंबाला चैनीत खाण्या-पिण्यात अडचण होणार नाही! छोट्या कुटुंबावर आफ्रिकेत जास्त टॅक्स लावत नाही ना!
प्रश्नकर्ता : देवाची भक्ति करणारे गरीब का असतात आणि दुःखी का असतात?
दादाश्री : भक्ति करणारे? त्याचे असे आहे, भक्ति करणारे दुःखी असतात असे काही नसते, पण काही माणसे तुम्हाला दु:खी दिसतात! बाकी, भक्ति केल्यामुळे तर ह्या लोकांकडे बंगले-गाडी आहेत. तात्पर्य भगवंताची भक्ति करणारा दुःखी असेल असे घडत नसते, पण हे दु:ख तर त्याच्या मागच्या जन्माचा हिशोब आहे. आणि सध्या भक्ति करत आहे हा त्याचा नवीन हिशोब आहे. त्याचे तर जेव्हा फळ येईल, तेव्हा येईल. तुम्हाला समजले ना? हे तर पूर्वी जे जमा केलेले त्याचे फळ त्याला आज मिळाले. आणि आता जे करीत आहे, जे चांगले करीत आहे त्याचे फळ त्याला नंतर मिळेल. समजले ना? तुम्हाला समजेल अशी गोष्ट आहे ना? समजत नसेल तर सोडून देऊ ही गोष्ट.
प्रश्नकर्ता : मानसिक शांती मिळविण्यासाठी माणसाने कुणी गरीब अशक्त माणसांची सेवा करावी, की मग देवाची भजना करावी? किंवा मग कुणाला दान द्यावे? काय करावे?