________________
पैशांचा व्यवहार
दादाश्री : मानसिक शांती हवी असेल तर आपल्या वाट्याचे दुसऱ्याला खाऊ घालावे. उद्या आईसक्रीमचा डबा भरून घेऊन ये आणि या सर्वांना खाऊ घाल. मग त्यावेळी किती आनंद होतो ते तू मला सांग. या कबूतरांना, पक्ष्यांना तू दाणे घालतोस तेव्हा ते किती आनंदाने उड्या मारतात. आणि तू त्यांना दिलेस, तुझी स्वतःची वस्तू दुसऱ्यांना दिलीस, की आत आनंदाची सुरुवात होते. आता रस्त्याने चालताना एखादा माणूस पडला आणि त्याचा पाय मोडला आणि रक्त वाहू लागले, त्यावेळी तुझे धातेर फाडून पट्टी बांधलीस तर तेव्हा तुला आनंद होईल.
या मुला-मुलींची लग्ने कशी होतात? असे आहे ना, मुलींच्या लग्नात खर्च जास्त होतो, मुली स्वत:चे सर्व घेऊनच येतात, त्याच बँकेत जमा करवितात. मुलींचे पैसे बँकेत जमा होतात आणि वडील खुष होतात की बघा, मुलीच्या लग्नात मी सत्तर हजार रुपये खर्च केले, त्या काळात! त्या काळची गोष्ट करीत आहे. अरे बाबा, तू काय केलेस? तिचे पैसे बँकेत जमा होते. तू तर आहेस तसाच आहेस, ‘पावर ऑफ एटर्नी' आहेस. त्यात तुझे काय? पण रुबाब मात्र तो करतो. आणि एखादी मुलगी (स्वत:च्या नशीबात) तीन हजार घेऊन आली असेल, आणि त्या वेळेला तिच्या बापाच्या व्यवसायात मंदीचा काळ असेल. तर तिचे लग्न तीन हजारातच होईल. कारण ती जितके पैसे घेऊन आली आहे तितका खर्च केला जातो.
ह्या मुले-मुली सर्वांचे स्वतःचेच पैसे आहेत. आपण जे जमा करून ठेवतो ना, ते तर त्याची वहीवाट तेवढी आपण सांभाळतो. बस, तेवढेच आपल्या हातात असते.
आपल्याकडे लोक म्हणतात, मी दुधात धुवून पैसे परत करीन. अरे वेड्या, हा अहंकार व्यर्थ आहे. मोठा आला दुधाने धुवून देणारा। मला पैसे परत करायचे आहेत असा भाव करावा, तेव्हा मग दिले जातील. घेताना, 'मला परत करायचे आहेत,' असे मनात ठरवून जो पैसे घेतो, त्याचा व्यवहार फार सुंदर होतो, हे मी पाहिले आहे ! आधी काहीतरी निश्चय तर करायला हवा ना! नंतर विपरीत संयोग जुळून आले, ती