________________
३४
पैशांचा व्यवहार
गोष्ट वेगळी आहे, परंतु आपला निश्चय तर असला पाहिजे ना! हेच तर 'पझल' आहे!
आपण विचारले की साहेब आपण काळजीत आहात की काय? तर म्हणतात, 'काय करू? ही तीन दुकाने, इथे सांभाळायचे तिथे सांभाळायचे!' आणि शेवटी स्मशानात जाताना नारळ तर फक्त चारच घेऊन जायचे. दुकाने तीन असोत, दोन असोत किंवा एक असो. नारळ तर चारच, आणि ते सुद्धा बिन पाण्याचे. म्हणेल कसा, 'तीन दुकाने सांभाळायची आहेत मला, एक दुकान फोर्टमध्ये आहे, एक कापडाचे दुकान इथे आहे, एक भूलेश्वरमध्ये आहे.' पण शेठजीचे तोंड तर एरंडेल पिल्यासारखे दिसते! जेवताना सुद्धा दुकान, दुकान, दुकान! रात्री स्वप्नात सुद्धा कापडाचे तागे मापत असतो! मरताना त्याची गोळाबेरीज येईल, म्हणून सावधानी बाळगा.
धंद्याचे विचार कुठवर करायचे? तर जोपर्यंत ओझे वाटत नाही, तोपर्यंत करायचे. ओझे वाटू लागले की मग बंद करायचे. नाहीतर मरणच
ओढवून घेत आहात हे समजून घ्या. चार पाय आणि वरुन शेपूट जास्तीचे मिळेल. मग हंबरणार! चार पाय आणि शेपूट समजलात ना तुम्ही?
(३) व्यवसाय, सम्यक् समजपूर्वक हिंदुस्तानात मनुष्याचा जन्म मिळाला, म्हणजे तो मोक्षाच्या हेतूसाठीच असतो. त्यासाठीच आपले जीवन आहे. जर हा हेतू ठेवला असेल तर त्यात जेवढे मिळेल तेवढे खरे. पण हेतू तर असायला हवाच ना? हे खाणे-पिणे सर्व त्यासाठीच आहे. आपणास समजले ना? जीवन कशासाठी जगायचे आहे? फक्त कमविण्यासाठीच? जीवमात्र सुखाच्या शोधात आहे. सर्व दु:खापासून मुक्ति कशी मिळवायची हे समजण्यासाठीच जीवन जगायचे आहे. त्यातून मोक्षमार्ग प्राप्त करून घ्यायचा आहे. मोक्षमार्गासाठीच हे सर्वकाही आहे.