________________
पैशांचा व्यवहार
दोन अर्थासाठी (हेतूसाठी) लोक जगतात. आत्मार्थी जगणारा तर क्वचितच कोणी विरळा असतो. बाकीची सर्व माणसे लक्ष्मी अर्थीच जगतात. दिवसभर लक्ष्मी, लक्ष्मी, आणि लक्ष्मी ! लक्ष्मीच्या मागे तर सर्व जग वेडे झाले आहे ना! पण त्यात सुख नसतेच कधीही ! बंगले तसेच रिकामे असतात आणि दुपारी स्वतः असतो कारखान्यात. तेव्हा मग बंगल्याचा उपभोगही घेऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञान जाणून घ्या ! ही अशी आंधळी भटकंती कुठवर ?
३५
कुणी विचारले की मी कोणता धर्म पाळावा ? तर आम्ही सांगतो की या तीन वस्तूंचे पालन कर, बाबा :
(१) एक तर नीतिमत्ता ! तुझ्याजवळ पैसे कदाचित कमी-जास्त असतील तरी हरकत नाही, पण नीतिमत्तेचे पालन अवश्य करावे, एवढे तरी कर, बाबा.
(२) नंतर दुसरे म्हणजे, ऑब्लाइजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) असावा. मदत करण्यासाठी आपल्याजवळ पैसे नसले तर बाजारात जाताना विचारावे 'तुम्हाला बाजारातून काही आणायचे असेल तर मला सांगा, मी निघालोय बाजारात.' अशा प्रकारे इतरांची मदत करावी. हा झाला ऑब्लाइजिंग नेचर.
(३) आणि तिसरे म्हणजे, त्याचा मोबदला मिळावा अशी इच्छा करू नकोस. सारे जग मोबदला मिळवण्याची इच्छा बाळगणारे आहे. तुम्ही इच्छा केली तरी मोबदला मिळेल आणि इच्छा नाही केली तरी मोबदला मिळेल. अशा अॅक्शन रिॲक्शन येतात. इच्छा ही तुमची भीक आहे, की जी वाया जाते.
प्रश्नकर्ता : आत्म्याच्या प्रगतीसाठी काय करत राहायला हवे ?
दादाश्री : त्याने प्रामाणिकपणाची निष्ठा बाळगून चालायला हवे. ती निष्ठा अशी आहे की जेव्हा खूप आखडून जाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा आत्मशक्तिचा आविर्भाव होतो. आणि जेव्हा पैशांची टंचाई नसते, भरपूर पैसे-बिशे असतात, तोवर आत्मा काही प्रकट होत नाही. प्रामाणिकपणा, हा एकच मार्ग आहे. केवळ भक्ति केल्याने होईल असे काही घडणार