________________
पैशांचा व्यवहार
२१
की, 'माझी इच्छा तर चांगलाच माल देण्याची आहे, पण हा असा माल आहे तो घेऊन जा.' इतके सांगितले तरी आपली जबाबदारी राहत नाही!
म्हणजे ही सर्व माणसे कितपत प्रामाणिक आहेत? जोपर्यंत त्यांना काळाबाजाराचा अधिकार प्राप्त झाला नाही तोपर्यंत.
प्रश्नकर्ता : लक्ष्मी किती प्रमाणात मिळवली पाहिजे?
दादाश्री : असे काही नाही. रोज सकाळी आंघोळ करावी लागते ना? तर कुणी असा विचार करतो की एकच तांब्या पाणी मिळाले तर काय होईल? तसेच लक्ष्मीचाही विचार करत राहण्याची गरज नाही. दीड बालदी मिळेल ते निश्चतच आहे आणि दोन तांबे मिळतील तर तेही निश्चितच आहे. त्यात कुणीही कमी जास्त करू शकत नाही. म्हणून मन-वचन-कायेने तू लक्ष्मीसाठी प्रयत्न कर, पण इच्छा मात्र करू नकोस. ही लक्ष्मीजी म्हणजे एका प्रकारे बँकबॅलेन्स आहे. बँकेत(पूर्वीची) शिल्लक असेल, तरच मिळेल ना? कुणी लक्ष्मीची इच्छा केली, तर लक्ष्मीजी म्हणतात, 'तुला या जुलैमध्ये पैसे मिळणार होते, पण ते आता पुढच्या जुलैमध्ये मिळतील.' आणि जर कुणी म्हटले, 'मला पैसे नकोत.' तर तोही मोठा गुन्हा आहे. लक्ष्मीजीचा तिरस्कारही करू नये आणि इच्छाही बाळगू नये. त्यांना तर नमस्कार केला पाहिजे. त्यांचा विनय केला पाहिजे. कारण ती तर हेड ऑफिसात आहे. लक्ष्मीजींचे आगमन, तर त्याचा काळ परिपक्व झाला की होणारच असते. हे तर इच्छा करीत राहिल्याने अंतराय (विलंब) होतो, लक्ष्मीजींचे म्हणणे असे की, 'ज्या काळी ज्या परिसरात राहायला हवे त्याकाळीच राहायला पाहिजे, आणि आम्ही योग्य वेळेवर पाठवूनच देतो. तुझा प्रत्येक ड्राफ्ट वगैरे सर्वकाही तुला अगदी वेळेवर मिळेल. पण माझी इच्छा मात्र करू नकोस. कारण जे नियमशीर आहे, ते व्याजासकट पाठवून देतो. जो इच्छा करीत नाही, त्याला वेळेवर पाठवून देतो.' लक्ष्मीजी आणखी काय म्हणतात? की, 'तुला मोक्ष हवा असेल तर हक्काची लक्ष्मी मिळेल त्याचाच स्वीकार कर, कुणाचेही हिसकावून किंवा लुबाडून घेऊ नकोस.
या लक्ष्मीजींची जेव्हा आमच्याशी भेट होते तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की 'बडोद्यात मामाची पोळ, आणि सहावे घर, जेव्हा अनुकूल