________________
पैशांचा व्यवहार
असतो. त्याचे शमन कसे करावे? शेवटी पुण्य सुद्धा संपून जाते. जगाचा नियम आहे की पुण्य संपले मग काय होणार? तर पापाचा उदय होणार. हा तर अंतरदाह आहे. पापाचा उदय झाला की बाहेरचा दाह पण सुरु होतो. त्यावेळी तुझी काय दैनावस्था होईल? म्हणून सावध व्हा, असे भगवंत सांगतात.
हे तर पुरण-गलन स्वभावाचे आहे. जितके पुरण झाले तेवढे गलनही होणार. आणि गलन झाले नाही, तरी पंचाईत. पण गलन होत आहे तेवढे परत खाल्ले जाते. हा श्वास घेतो ते पुरण केले आणि उच्छवास काढला ते गलन झाले. सर्वकाही पुरण-गलन स्वभावाचे आहे. म्हणून आम्ही शोधून काढले की 'टंचाई नाही आणि अधिकही नाही! आमच्याकडे कधीही लक्ष्मीची कमतराताही भासत नाही आणि ऊतूही जात नाही!' कमतरता असलेला कोमेजून जातो आणि अधिक असलेल्याला सुज येते. ऊतू जाणे म्हणजे काय की लक्ष्मीजी तिथून दोन-तीन वर्षांपर्यंत हलतच नाही. लक्ष्मी तर चालत-फिरत असलेली बरी, नाहीतर दुःखदायी होते.
मला कधी टंचाई पण झाली नाही. आणि जास्तही झाली नाही. लाख येण्यापूर्वी कोणताही बॉम्ब येतो आणि खर्च होतो. त्यामुळे ऊतू जाण्याचा प्रश्नच कधी उद्भवत नाही, आणि टंचाई पण झाली नाही.
प्रश्नकर्ता : लक्ष्मी कशामुळे कमी होते?
दादाश्री : चोरीमुळे. जिथे मन-वचन-कायेने चोरी होत नसेल तिथे लक्ष्मीजीची कृपा होते. लक्ष्मीचे अंतराय चोरीमुळे घडतात. ट्रिक (चलाखी) आणि लक्ष्मी यांचे वैर आहे. स्थूल चोरी बंद होते तेव्हा तर उच्च कुळात जन्म होतो. परंतु सूक्ष्म चोरी म्हणजे ट्रिक्स करणे, हे तर हार्ड(तीव्र) रौद्रध्यान आहे आणि त्याचे फळ नर्कगति आहे. हे कापड मापताना ताणून कमी दिले, तर ते हार्ड रौद्रध्यान आहे. ट्रिक तर अजिबात नसावी. ट्रिक केली कशास म्हणतात? 'फार उत्तम माल आहे' असे सांगन भेसळयुक्त माल देऊन जो मनात खुष होतो. आणि जर आपण विचारले की, 'असे करणे बरे आहे का?' तर म्हणतो कसा, 'हे तर असेच करावे लागते,' पण ज्याला प्रामाणिकपणाची इच्छा आहे त्याने काय म्हणावे