________________
पैशांचा व्यवहार
कितीही पैसे असले तरी शेवटी पैसे काही सोबत येणार नाहीत. म्हणून मोक्षाचे काम साधून घ्या. आता परत मोक्षमार्ग मिळणार नाही. एक्याऐंशी हजार वर्षांपर्यंत मोक्षमार्ग हाती लागणार नाही. हा सर्वात शेवटचा 'स्टॅन्ड' (मुक्काम) आहे. आता या पुढे कोणताही 'स्टॅन्ड' नाही.
पैशाचे किंवा इतर संसारातील वस्तूंचे देणे नसते, राग-द्वेष यांचे देणे असते. पैशाचे देणे असते तर आम्ही असे म्हटले असते की, बाबा, पाचशे मागत आहे तर तू पाचशे पूर्णच परत कर, नाहीतर तुझी सुटका होणार नाही! आम्ही तर काय म्हणतो की, या बाबतीचा निकाल लाव, शेवटी पन्नास देऊन पण तू निकाल कर, आणि मग त्याला विचार की 'बाबा, तू खुष आहेस ना?' आणि तो जर म्हणाला की 'होय, मी खुष आहे.' म्हणजे झाला निकाल.
तुम्ही जिथे जिथे राग-द्वेष केले असतील, ते राग-द्वेष तुम्हाला परत मिळतील.
कोणत्याही परिस्थितीत हिशोब चुकता करा. हिशोब चुकता करण्यासाठी हा जन्म आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वकाही अनिवार्य आहे.
एक सावकार स्वतःच्या कर्जदाराला खूप त्रास देत होता. तेव्हा तो बिचारा मला म्हणाला, 'हा सावकार मला खूप शिव्या देतो.' मी म्हटले, 'तो पुन्हा आला की मला कळव.' नंतर जेव्हा तो सावकार(घेणेकरी) आला, तेव्हा त्याने मला बोलविले. मी त्यांच्या घरी गेलो. मी बाहेरच्या खोलीत बसलो होतो. आतल्या खोलीत सावकार त्या माणसाला हवे तसे ओरडून बोलत होता. 'तुम्ही अशी नालायकी करता? ही तर बदमाशी आहे, वाटेल तशा शिव्या देऊ लागला. मग मी आत गेलो आणि म्हणालो, 'तुम्ही यांना पैसे दिले आहेत ना?' तर म्हणाला 'होय,' मी म्हणालो, "हे बघा, मी देण्याचे एग्रीमेन्ट(करार) केले आहे आणि तुम्ही घेण्याचे एग्रीमेन्ट केलेले आहे. आणि तुम्ही ज्या शिव्या देत आहात, ती 'एक्स्ट्रा आईटम'(जास्तीचे) देत आहात. त्याचे पेमेन्ट तुम्हाला चुकते करावे लागेल. शिव्या देण्याची अट करारात नव्हती. प्रत्येक शिवीचे चाळीस रुपये कट