________________
पैशांचा व्यवहार
केले जातील. विनय चुकला ही तर 'एक्स्ट्रा आइटम' झाली म्हणायची, कारण तुम्ही कराराच्या बाहेर गेला आहात." असे म्हटल्यावर तो हमखास ताळ्यावर येईल. आणि पुन्हा अशा शिव्या देणार नाही.
एका व्यक्तिने तुमचे अडीचशे रुपये परत दिले नाही आणि तुमचे अडीचशे बुडाले. त्यात चूक कुणाची ? तुमचीच ना ? भोगतो त्याची चूक. या ज्ञानाप्रमाणे धर्म घडला, त्यामुळे समोरच्या माणसावर आरोप करणे, कषाय करणे, वगैरे सर्वकाही सुटून जाईल. अर्थात 'भोगतो त्याची चूक' ही समज तर मोक्षापर्यंत घेऊन जाईल अशी आहे. हे तर एक्जॅक्ट विज्ञान बाहेर पडले आहे की, 'भोगतो त्याची चूक. '
प्रश्नकर्ता : दादाजी, हे ज्ञान उत्पन्न झाले त्यापूर्वी आपली बरीच भूमिका तयार झाली असेल, नाही का ?
दादाश्री : भूमिका म्हणायची, तर मला काही येत नव्हते. येत नव्हते म्हणून तर मेट्रीक नापास होऊन बसून राहिलो. माझ्या भूमिकेत एक चारित्र्यबळ मात्र फार मोठे होते, हे मी पाहिले होते, आणि तरीही चोऱ्या केल्या होत्या. शेतात झाडावर बोरे आली की मित्रांसोबत जात होतो. तर आंब्याचे झाड कुणा दुसऱ्याचे आणि कैऱ्या आम्ही तोडत होतो, ही चोरी नाही का म्हणायची ? तर लहानपणात सर्व मुले कैऱ्या खाण्यासाठी शेतात निघाली की आम्ही पण सोबत जात होतो. आणि मी सुद्धा खात होतो, पण घरी मात्र कधीही घेऊन जात नव्हतो.
आणि दुसरे, व्यवसाय सुरु केला तेव्हापासून, मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या व्यवसायासंबंधी कधीही विचार केला नाही. आमचा व्यवसाय चालत होता तसा चालत रहायचा, पण जर तुम्ही आमच्याकडे आलात तर सर्वात आधी तुमची विचारपूस करेन 'आपले कसे काय चालले आहे ? आपल्याला काही आडचण तर नाही ना ? म्हणजे असे तुमचे समाधान करेन! नंतर दुसरे कोणी आले की त्यांना विचारायचे की तुमचे कसे चालले आहे ? सर्व ठीक आहे ना? म्हणजे लोकांच्या अडचणी दूर करण्याच्या व्यापातच असायचो. आयुष्यभर हाच धंदा केला होता. याखेरीज दुसरा कसला धंदाच केला नाही, कधीही.