________________
पैशांचा व्यवहार
___ ५३
प्रश्नकर्ता : मनुष्य देणे मागे ठेऊन मृत्यू पावला तर काय होते?
दादाश्री : देणे ठेऊन मृत्यू पावला तर? देणे मागे सोडून मृत्यू झाला पण तरी मनात मरेपर्यंत एक गोष्ट निश्चितपणे असायला हवी की मला हे पैसे परत करायचेच आहेत. काय? या जन्मी शक्य नसेल, तर पुढच्या जन्मी पण मला नक्कीच परत करायचे आहेत. असा भाव ज्याचा मनात आहे, त्याला कोणतीही अडचण येणार नाही.
नियम असा आहे की पैसे घेते वेळीच ठरवलेले असते की याचे पैसे मला परत द्यायचे आहेत. त्या नंतर मग दर चार दिवसांनी ते लक्षात राहिले पाहिजे की, 'हे पैसे मला शक्य तितक्या लवकर परत करायचे आहेत.' अशी भावना करावी. अशी भावना असेल तरच पैसे परत दिले जातील, नाहीतर हरि हरि, राम तुझी माया.
तुम्ही कुणाचे पैसे उसने घेतले असतील आणि तुमची भावना शुद्ध असेल, तर समजावे की तुम्ही ते पैसे परत करू शकाल. मग त्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. मनोभाव शुद्ध आहे की नाही, हेच तपासायचे, हेच त्याचे लेव्हल (मापदंड) आहे. समोरच्या माणसाची भावना शुद्ध आहे की नाही, यावरुन आपल्याला कळेल. जर त्याची भावना शुद्ध राहत नसेल तर आपण समजून घ्यावे की आपले पैसे बुडणार आहेत.
भावना शुद्ध असायलाच हवी. भावना म्हणजे, तुमच्या अधिकारात तुम्ही काय कराल? तर म्हणे, 'आज जर माझ्याकडे तेवढे पैसे असते तर आजच सर्व परत केले असते! याला म्हणतात शुद्ध भावना. त्याची भावना तर हीच असेल की लवकरात लवकर पैसे परत करू!
प्रश्नकर्ता : कुणी दिवाळे काढले आणि नंतर पैसे परत केलेच नाही तर काय त्याला दुसऱ्या जन्मी पैसे परत करावे लागतात?
दादाश्री : त्या माणसाला परत पैशाचे तोंडही बघायला मिळत नाही. त्याच्याजवळ पैसे येतच नाहीत. आपला कायदा काय म्हणतो की पैसे परत करायच्या बाबतीत तुमचे भाव बिघडायला नकोत, तर नक्कीच एक दिवस तुमच्या हातात पैसे येतील आणि कर्जफेड होईल. माणसाजवळ