________________
पैशांचा व्यवहार
दादाश्री : जेव्हा त्याचे वाईट घडणार असेल तेव्हा त्याच्या मनात फोर्स उत्पन्न होतो की 'तू असा फिरुन जा ना, मग जे होईल ते होऊ दे.' त्याचे बिघडणार आहे म्हणून. 'कमिंग इवेन्ट्स कास्ट देअर शेडोज बिफोर.' (जे घडणार आहे त्याची सावली आधीच पडत असते.)
५२
प्रश्नकर्ता : पण काय तो त्या घडणाऱ्या घटनेला थांबवू शकतो ?
दादाश्री : होय, थांबवू शकतो. जर त्याला हे ज्ञान प्राप्त झाले असेल की 'वाईट विचार जरी आले तरीही तू त्याचा पश्चाताप कर. त्याने जर असे म्हटले की, 'हे चुकीचे आहे, असे घडू नये.' अशा प्रकारे थांबवू शकतो. वाईट विचार मनात येतात ते मुळात पूर्वीच्या ज्ञानाच्या आधारावर येत असतात. परंतु आजचे ज्ञान त्याला असे सांगते की हे करण्यासारखे नाही. त्यामुळे मग तो थांबवू शकतो. आले लक्षात? ही गोष्ट स्पष्ट होत आहे ना ?
दानत बिघडवायची म्हणजे पाच लाख रुपयांसाठी बिघडवायची असे नाही. जळलं, पंचवीस रुपयांसाठी सुद्धा नियत बिघडू शकते! अर्थात् यात उपभोग घेण्याच्या इच्छेचा प्रश्न नाही पण त्याला अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले आहे की, ' द्यायचे कशाला ?' देण्यापेक्षा आपण इथेच वापरुया की. पुढचे पुढे पाहून घेऊ. असे उलटे ज्ञान मिळाले आहे त्याला.
म्हणून आता आम्ही सर्वांना असे सांगू शकतो की, बाबा, हवे तितके व्यवसाय-धंदे करा, नुकसान झाले तरी हरकत नाही, परंतु मनात मात्र एक भाव दृढ असू द्या की मला सर्वांचे पैसे परत करायचेच आहेत. कारण पैसा कुणाला प्रिय नसतो ? हे मला सांगा. कुणाला प्रिय नसतो? सर्वांनाच प्रिय असतो. त्यामुळे, त्याचे पैसे बुडले तरी चालेल असा भाव सुद्धा आपल्या मनात उत्पन्न होता कामा नये. काहीही झाले तरी, मला पैसे परत करायचेच आहेत, असा निर्णय पहिल्यापासून मनात धरुन ठेवला पाहिजे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या कशात नादारी काढली असेल तर चालू शकेल पण पैशाच्या बाबतीत नादारी काढू पैसे दुःखदायी आहेत. पैशाला, तर अकरावा प्राण म्हटला आहे. कुणाचेही पैसे बुडवू नये. ही सर्वात मोठी गोष्ट आहे.
नये.
कारण
म्हणून