________________
१८
पैशांचा व्यवहार
मा० मिगत.
आम्ही आमच्या बुद्धीच्या आशयात १०० टक्के धर्म आणि जगत कल्याणाची भावना घेऊन आलो आहोत. दुसऱ्या कोणत्याही जागी आमचे पुण्य खर्च झालेच नाही. पैसे, मोटार, बंगला, मुलगा, मुलगी कशातही नाही.
आम्हाला जे कोणी भेटले, आणि ज्ञान प्राप्त केले, त्यांनी दोन-पाच टक्के धर्मासाठी-मुक्तीसाठी ठेवले होते, त्यामुळे आमच्याशी भेट झाली. आम्ही सर्व शंभरचे शंभर टक्के धर्मातच टाकले, त्यामुळे सगळीकडून आम्हाला धर्मासाठी 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' मिळाले.
कोणी बाहेरचा मनुष्य माझ्याजवळ व्यावहारिक सल्ला घेण्यासाठी आला की 'मी कितीही प्रयत्न केले तरी काही उपजत नाही,' असे म्हणाला, तर मी त्याला सांगतो, 'सद्या तुझ्या पापाचा उदय आहे, त्यामुळे कुणाकडून उसने रुपये जरी घेऊन आलास, तर रस्त्यातच तुझा खिसा कापला जाईल! त्यामुळे अशावेळी तू घरी बसून निवांतपणे जे काही शास्त्रवाचन करीत असशील ते कर आणि देवाचे नामस्मरण करीत रहा.
___ पापाचे पुरण करीत आहेत, (बी पेरतो) ते जेव्हा गलन होईल (फळ येईल) तेव्हा कळेल! तेव्हा हादरुन जाशील! विस्तवावर बसवले आहे असे वाटेल! पुण्याचे पुरण करशील तेव्हा कळेल की किती वेगळाच आनंद आहे ! म्हणूनच जे काही पुरण कराल ते समजून उमजून करा, की जेव्हा गलन होईल तेव्हा कशा प्रकारचे परिणाम भोगावे लागतील! पुरण करताना सतत ध्यानात असू दे, पाप करताना, कुणाला लुबाडून पैसे गोळा करताना, सतत ध्यानात असू दे की याचे पण गलन होणार आहे. ते पैसे बँकेत जमा केले तरीही ते जाणार तर आहेतच. त्याचे सुद्धा गलन तर होणारच आहे. शिवाय ते पैसे मिळवताना जे पापकर्म केले, जे रौद्रध्यान केले, ते त्याच्या धारासहित, हिशोबासोबत येईल ते पुन्हा अधिक आणि जेव्हा त्याचे गलन होईल तेव्हा तुझी काय दैनावस्था होईल?
निसर्ग काय म्हणतो? त्याने किती पैसे वापरले हे आमच्याकडे बघितले जात नाही, तर त्याला कोणते वेदनीय कर्म भोगावे लागले, शाता( सुख) परिणाम की अशाता( दुःख) परिणाम, एवढेच आमच्याकडे बघितले जाते. पैसे नसले तरी शाता भोगेल, आणि पैसे असले तरीही