________________
पैशांचा व्यवहार
थोडे खरे धन आहे. दोन प्रकारची पुण्याई असते. एक पापानुबंधी पुण्य की जे अधोगतिकडे घेऊन जाते, असे पुण्य, आणि जे उर्ध्वगतित घेऊन जाईल ते पुण्यानुबंधी पुण्य. परंतु असे धन फारच थोडे उरले आहे. अलीकडे लोकांजवळ हे जे पैसे दिसतात, ते पापानुबंधी पुण्याचे पैसे आहेत. आणि ते तर निव्वळ कर्मबंधनच करवितात व भयंकर अधोगति ओढवून घेतात. पुण्यानुबंधी पुण्य तर कसे असते? निरंतर अंतरशांतीसह वैभव असते आणि तिथे धर्मही असतो.
आजची लक्ष्मी पापानुबंधी पुण्याईची आहे, त्यामुळे ती क्लेश घडवून आणते, त्यापेक्षा ती कमी असलेली बरी. घरात क्लेश तर शिरणार नाही. आज तर जिथे जिथे लक्ष्मीला प्राधान्य आहे तिथे क्लेशचे वातावरण पाहायला मिळते. मीठ-भाकर बरी, पण असले पंचपक्वान्नांचे भोजन नको. या काळात जर खरी लक्ष्मी घरात आली तर एकच रुपया असू दे, ओहोहो.... किती सुख प्रदान करून जाईल. पुण्यानुबंधी पुण्य तर घरात सर्वांना सुखशांती देऊन जाईल! घरात सर्वांना केवळ धर्माचेच विचार येत राहतील.
मुंबईत एका उच्च संस्कारी कुटुंबातील भगिनीला मी विचारले, 'घरात क्लेश तर होत नाही ना?' तर त्या भगिनीने उत्तर दिले, 'रोज सकाळी क्लेशाचाच नाष्टा असतो!' मी म्हटले, 'म्हणजे तुमचे नाष्ट्याचे पैसे वाचले तर! नाही का?' त्यांनी उत्तर दिले, 'नाही, तरी पण (पैसे) काढायचेच. ब्रेड वर लोणी लावत राहायचे.' म्हणजे क्लेश पण चालू आणि नाष्टा पण चालू. अरे, कुठल्या प्रकारचे मनुष्य आहात?!
नेहमी, लक्ष्मी जर निर्मळ असेल तर सर्वकाही चांगले राहते, मन पण चांगले राहते. ही तर बिनहक्काची लक्ष्मी शिरल्यामुळे क्लेश होत आहेत. आम्ही तर लहानपणापासून ठरविले होते की शक्य तो जी आपल्या मेहनतीची नाही अशी बिनहक्काची लक्ष्मी घरी येऊच द्यायची नाही. तर आज सहासष्ट वर्षे झाली, पण घरात खोटी (बिनहक्काची) लक्ष्मी येऊच दिली नाही. म्हणून तर घरात कधीही क्लेश झालाच नाही. घरात ठरवूनच टाकले होते की इतक्या पैशातच घर चालवायचे. धंद्यात लाखो रुपये कमावतो पण हे 'पटेल' (दादाजी) जर नोकरी करायला गेले तर त्यांना