________________
पैशांचा व्यवहार
किती पगार मिळेल? फार तर सहाशे-सातशे रुपये मिळतील. धंधा, हा तर पुण्याईचा खेळ आहे. त्यामुळे नोकरीत मिळू शकतील तितकेच पैसे घरखर्चासाठी वापरायचे. बाकीचे धंद्यातच राहू द्यायचे. इन्कमटॅक्सवाल्याची मागणी आली, तर आपण सांगायचे, जी रक्कम शिल्लक ठेवली होती ती वापरा. कधी कुठला अॅटॅक (संकट) येईल हे सांगता येत नाही. आणि जर ते शिल्लक ठेवलेले पैसे खर्चुन टाकले असतील तर तिकडे इन्कमटॅक्सवाल्याचा अॅटॅक आला तर इकडे आपल्याकडे तो दुसरा (हार्ट) अॅटॅक येईल. सगळीकडे अॅटॅक घुसले आहेत ना? याला जीवन कसे म्हणता येईल? तुम्हाला काय वाटते? चूक घडत आहे असे नाही का वाटत? तर आपण ही चूक सुधारण्याची आवश्यकता आहे.
लक्ष्मी सहजपणे जमा होत असेल तर होऊ द्या. किंतू तिचा आधार घेऊन बसायचे नाही. आधार धरुन हुश्श्... कराल, परंतु केव्हा तो आधार सरकून जाईल, हे सांगता येत नाही. म्हणून सावध राहून चला ज्यामुळे अशाता वेदनीय(दु:ख परिणाम) आले तेव्हा त्यात हादरुन जाण्याची वेळ येणार नाही.
प्रश्नकर्ता : सुंगधासह लक्ष्मी, ही लक्ष्मी कशी असते?
दादाश्री : ती लक्ष्मी आपल्यास कुठल्याही प्रकारे कष्ट पडू देत नाही. घरात फक्त शंभर रुपयेच असतील, तरी आपणास काळजी वाटत नाही. कुणी बातमी दिली की उद्यापासून साखरेवर कंट्रोल (रेशनिंग) येणार आहे, तरीपण मनात काळजी वाटत नाही. धडधड होत नाही. वर्तन कसे सुगंधित, वाणी कशी सुगंधित, आणि त्याला पैसे कमावण्याचा विचार सुद्धा येत नाही, असे तर त्याचे पुण्यानुबंधी पुण्य असते. पुण्यानुबंधी पुण्य असलेली लक्ष्मी असेल त्याला पैसे मिळवण्याचा विचार देखील येत नाही. ही तर सगळी पापानुबंधी पुण्याईची लक्ष्मी आहे. तिला लक्ष्मी म्हणता येणारच नाही! निव्वळ पापाचेच विचार येत राहतात 'पैसे कसे गोळा करू, कसे गोळा करू' यालाच पाप म्हणायचे. असे म्हणतात, की पूर्वीच्या काळी श्रीमंतांकडे पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी असायची! ती लक्ष्मी त्यांच्याकडे गोळा होत होती, त्यांना गोळा करावी लागत नव्हती. जेव्हा की ह्या लोकांना तर लक्ष्मी गोळा करावी लागते. पूर्वीची लक्ष्मी