________________
पैशांचा व्यवहार
५७
सांगावे. आणि तरीही नाही मिळाले तर समजायचे की आपला पूर्वीचा काही हिशोब होता तो चुकता झाला. परंतु आपण प्रयत्नच नाही केला तर तो आपल्याला मूर्ख समजेल आणि उलट दिशेने जाईल.
हा संसार म्हणजे कोडेच आहे. यात मनुष्य बिचारा मार खाऊन खाऊन मरून जातो! अनंत जन्मापासून मारच खात राहिला आणि जेव्हा सटका होण्याची वेळ येते तरीही स्वत:ची सुटका करून घेत नाही. पण मग सुटका करून घेण्याची अशी संधी पुन्हा येतच नाही ना! आणि जो सर्व बंधनापासून मुक्त झालेला आहे तोच आपल्याला सोडवू शकतो. जो स्वत:च बंधनात आहे तो आपल्याला कसे सोडवेल? जो मुक्त झाला आहे त्याचेच महत्व आहे. 'याने जर पैसे परत दिले नाही तर काय होईल? असा विचार केल्याने तर आपले मन कमकुवत होत जाते. म्हणून कोणाला पैसे दिल्यानंतर ठरवूनच टाका की काळ्या चिंधीत बांधून समुद्रात सोडत आहे, मग काय तुम्ही त्याची आशा करणार? देण्यापूर्वीच परतीची आशा न ठेवता द्या, अन्यथा देऊच नका.
असे आहे, आपण कुणाकडून पैसे उसने घेतले असतील, किंवा दिले असतील, जगात घेणे-देणे करणे भागच आहे ना! म्हणजे आपण काही लोकांना पैसे दिले असतील, त्यातून कोणी पैसे परत केले नाही तर त्याच्यासाठी मन कुरकुर करत राहते की 'केव्हा देईल? केव्हा देईल?' आता असे केल्याने काय फायदा?
आमच्या बाबतीत पण असे घडले होते ना! पैसे परत येतील की नाही याची काळजी आम्ही पूर्वीपासूनच करत नव्हतो. पण साधारण प्रयत्न नक्कीच करायचो. त्या व्यक्तिला सांगून बघायचो. आम्ही एका माणसाला ५०० रुपये दिले होते. आता अशी रक्कम काही वहीखात्यावर लिहिलेली नसते आणि चिठ्ठीत सुद्धा सही वगैरे नसते. तर त्या गोष्टीला वर्ष, दीड वर्ष झाले असेल. माझ्याही कधी लक्षात राहिले नव्हते. पण एक दिवस त्या माणसाची भेट झाली, आणि तेव्हा मला आठवले, मी त्याला म्हणालो, 'ते पाचशे रुपये तुम्ही पाठवून द्या.' तर तो म्हणतो कसा की ‘कोणते पाचशे?' मी म्हटले, 'तुम्ही माझ्याकडून घेऊन गेला होतात