________________
पैशांचा व्यवहार
ते.' तर तो म्हणाला 'तुम्ही कधी मला उसने दिले होते? रुपये तर, मी तुम्हाला दिले होते, विसरलात की काय?' मी लगेच समजलो. मग मी म्हणालो, 'हो, माझ्या लक्षात आहे तर, मग आता उद्या येऊन घेऊन जा. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याला पैसे देऊन टाकले. तो मनुष्य गळ्यात पडला की तुम्ही माझे पैसे देत नाही, मग काय करणार? असे सर्व घडलेले.
अशा या जगात कसा निभाव लागेल? आपण कुणालातरी पैसे दिले, तर जसे पैसे काळ्या चिंधीत बांधून समुद्रात टाकल्यानंतर त्याच्या परतीची आशा करणे, यासारखी मूर्खता आहे ही. जर पैसे परत आले तर जमा करून घ्यायचे, आणि त्या दिवशी त्याला चहा पाजून म्हणायचे 'बाबा, तुमचे उपकार आहे की तुम्ही पैसे परत आणून दिले, नाहीतर या काळात पैसे परत मिळणे दुर्लभच आहे. तुम्ही परत दिले हेच मोठे आश्चर्य म्हणायचे.' तो जर म्हणाला 'व्याज मिळणार नाही' तर आपण म्हणायचे, 'मुद्दल आणून दिलेस तेच फार झाले! आले का लक्षात? जग हे असे
आहे. ज्याने घेतले आहे त्याला परत करण्याचे दुःख आहे, उधार देतो त्याला परत मिळतील की नाही याचे दुःख आहे. आता यात सुखी कोण? आणि खरेतर सर्व 'व्यवस्थित' आहे! परत देत नाही हेही 'व्यवस्थित' आहे, आणि डबल दिले तर तेही 'व्यवस्थित' आहे.
प्रश्नकर्ता : आपण त्या माणसाला पदरीचे पाचशे का दिले?
दादाश्री : पुन्हा कोणत्याही जन्मात त्याची गाठ पडण्याचा प्रसंग येऊ नये, म्हणून.
लोकांना जेव्हा हे कळले की माझ्याकडे पैसे आले आहेत, तेव्हा माझ्याकडे पैसे मागण्यासाठी येऊ लागले. तेव्हा मग १९४२ पासून १९४४ पर्यंत त्या सर्वांना मी देत राहिलो. नंतर १९४५ मध्ये मी ठरवले की आता आपल्याला मोक्षमार्गावरच चालायचे आहे. तेव्हा आता या लोकांशी मेळ कसा बसणार? मी विचार केला की दिलेल्या पैशांची वसुली करायला गेलो, तर ते परत पैसे मागायला येतील, आणि हा व्यवहार चालूच राहील. वसुली करायला गेलो तर पाच हजार देऊन परत दहा हजार मागायला येतील, त्यापेक्षा हे पाच हजार त्यांच्याजवळ राहिले तर तो मनात म्हणेल,