________________
पैशांचा व्यवहार
त्याच्या विरुद्ध जावे लागते. कारण त्याशिवाय ते वठणीवर येत नाही. जसे घरची मंडळी बेकाबू होत असेल तर त्यांच्या विरुद्ध जावे लागते, तसेच मनाला काबूत आणण्यासाठी त्याच्या विरुद्ध वागावे लागते.
लोभ ग्रंथी म्हणजे काय? कुठे किती पैसे आहेत? तिथे किती आहेत? हेच डोक्यात फिरत राहते. बँकेत इतके आहेत, त्याज्याजवळ इतके आहेत, या जागी इतके आहेत, हेच सारखे ध्यानात असते. 'मी आत्मा आहे, हे त्याच्या लक्षात राहत नाही. लोभात जे लक्ष्य गुंतले आहे ते तुटले पाहिजे. 'मी आत्मा आहे' हेच लक्ष्य असायला पाहिजे.
लोभी माणसाचा तर स्वभावच असा असतो की तो कोणत्याही रंगात रंगतच नाही. त्याच्यावर कोणताही रंग चढू शकत नाही! जर कोणी लोभी असेल तर तुम्ही हे समजूनच घ्या की त्याच्यावर कोणताही रंग चढणार नाही! लाल रंगात भिजवला तरी पिवळ्याचा पिवळाच राहणार! आणि हिरव्यात भिजवला तरी तो पिवळ्याचा पिवळाच!
लोभ वृत्ती नसलेली सर्व माणसे रंगतात. परत तो लोभी हसत राहतो त्यामुळे आपल्याला वाटते की हा रंगून गेला. मी जे काही बोलतो ते सर्वच ऐकत असतो. फार उत्तम गोष्ट, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, इत्यादि शेरे मारतो, पण आतून तन्मयाकार होत नाही. अर्थात दुसरी माणसे तन्मयपणे आपले घरदार विसरुन जातात पण हा काही विसरत नाही. आपला लोभी स्वभाव विसरत नाही. आत्ता यांच्यासोबत यांच्या गाडीतून गेलो की पाच रुपये वाचतील, हे गणित त्याच्या लक्षातच असते. दुसरी माणसे पाच रुपये वाचवायचे विसरुनच जातील, 'नंतर जाऊ,' असे म्हणतील. पण लोभी मात्र विसरणार नाही. तो रंगात रंगला असे म्हणता येणार नाही. रंगला असे केव्हा म्हणता येईल की जेव्हा तन्मयाकार होऊन जाईल. घरदार सर्व विस्मृत होईल तेव्हा. आले का तुमच्या लक्षात? ही माणसे म्हणतात ना, की दादाजींचा रंग लागला? त्याला (लोभ्याला) दादाजींचा रंग लागत नाही. कितीदा तरी रंगात बुडवत राहिलो तरी रंग लागत नाही!
___ मनात पैसे देण्याचा भाव जागृत होतो की आपण देऊया, तरी पण देऊ शकत नाही, त्यास म्हणतात लोभ ग्रंथी.