________________
पैशांचा व्यवहार
८१
प्रश्नकर्ता : काही वेळेस संयोगच असे जुळून येतात की देण्याचा मनात भाव असून सुद्धा दिले जात नाहीत.
दादाश्री : ती गोष्ट वेगळी. ते तर आपल्याला असे वाटते की संयोग असे आहेत, पण तसे नसते. देण्याचा निश्चय पक्का असेल तर देऊ शकू. असे आहे.
प्रश्नकर्ता : होय. पण असूनसुद्धा देत नाही.
दादाश्री : असून सुद्धा दिले जात नाही, दिलेच जात नाही ना, तो बांध तुटतच नाही. तो बांध जर तुटला तर मोक्षच होईल ना! ही काही सोपी गोष्ट नाही.
प्रश्नकर्ता : तसे पाहिले तर प्रत्येकाची आपल्या लिमीटमध्ये थोडे फार देण्याची शक्ति तर असतेच ना?
दादाश्री : नाही, लोभामुळे तसे घडत नाही. लोभीजवळ लाख रुपये असले तरी चार आणे सुटणे अवघड! थंडीताप येईल. अरे, इतकेच नव्हे तर, कुठे पुस्तकात वाचले की ज्ञानी पुरुषाची तन, मन, धनाने सेवा करावी. तर ते वाचताना त्याला ताप भरतो की असे का लिहितात !
लोभ तुटण्याचे दोन रस्ते आहेत. एक तर ज्ञानीपुरुष तोडू शकतात आपल्या वचनबळाने आणि दुसरे म्हणजे फार मोठे, जबरदस्त नुकसान झाले की ताळ्यावर येतो आणि लोभ तुटतो की मला आता काहीच करायचे नाही, आता जे थोडेफार उरले आहेत त्यातच निभावून घ्यायचे. कितीतरी लोकांना मला हे सत्य सांगावे लागते की तोटा येईल तेव्हा लोभ सुटेल. त्याखेरीज लोभ सुटणार नाही. आमच्या सांगण्याने सुद्धा सुटणार नाही. अशी खच्चून गाठ पडलेली असते. ___लोभी माणसाची गाठ मोठा तोटा झाल्यावर तुटते. किंवा जर ज्ञानीपुरुषाची आज्ञा मिळाली तर उत्तम. पण मग आज्ञा पालन करण्याची ज्याची तयारी नाही, त्याला कोण सुधारु शकेल?
नियमित सत्संगात राहिल्याने गाठी वितळतात. जोपर्यंत सत्संगाचा