________________
पैशांचा व्यवहार
परिचय नसेल तोपर्यंत गाठी आहेत याची जाणीव सुद्धा नसते. सत्संगात राहिल्याने (गाठी) निर्मळ होऊ लागल्या आहेत असे जाणवते. कारण 'आपण' दूर राहिलो ना! दूर राहून सर्व सावकाश पाहायचे. त्यामुळे आपल्याला आपले सर्व दोष दिसू लागतात. नाहीतर गाठीत राहून दोष बघतो, त्यामुळे दोष दिसत नाहीत. म्हणूनच कृपाळुदेवांनी सांगितले आहे कि 'दीठा नहीं निज दोष तो तरीए कोण उपाय !' (जर स्वत:चे दोष दिसले नाहीत, तर कोणत्या उपायाने तरशील ?)
८२
आपले जीवन कुणाच्या लाभासाठी व्यतीत व्हावे, जशी ही मेणबत्ती जळत असते ना ? ती स्वतःला प्रकाश मिळावा म्हणून जळेत का? दुसऱ्यांसाठी, परार्थ जळत असते ना ? इतरांच्या फायद्यासाठी जळत असते ना? त्याच प्रमाणे ही माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी जगू लागली, तर त्यांचे हितही त्यातच सामावलेलेच असते. नाहीतरी एक दिवस मरण तर येणारच ना ? तेव्हा जर इतरांचा फायद्या (कल्याण) साठी जगलास तर तुझा फायदा (कल्याण) हा त्यात असरणारच, आणि जर इतरांना त्रास देण्याच्या नादात राहिलास तर तू स्वतःसाठी पण त्रासच ओढवून घेशील. मग आता तुला जे करायचे असेल ते कर.
आत्मा प्राप्त करण्यासाठी जे काही केले जाते, ते मेन प्रोडक्शन आहे, आणि त्यामुळे बायप्रोडक्शनही प्राप्त होते, ज्यामुळे संसाराची सर्व आवश्यकताही पूर्ण होते, मी माझे एकाच प्रकारचे प्रोडक्शन ठेवतो, संपूर्ण जगात सर्वांना परम शांती होवो आणि कित्येकांना मोक्ष मिळो. हे माझे प्रोडक्शन आणि त्याचे बायप्रोडक्शन मला मिळतच राहते ! आम्हाला चहानाष्टा तुमच्यापेक्षा काही वेगळ्या प्रकारचा मिळतो, त्याचे काय कारण ? तर माझे प्रोडक्शन तुमच्यापेक्षा उच्च कोटीचे आहे. तसे तुमचे प्रोडक्शनही जर उच्च कोटीचे झाले तर त्याचे बायप्रोडक्शनही उच्च कोटीचे होईल.
आपल्याला फक्त आपला हेतूच बदलायचा आहे. दुसरे काही करायचे नाही. पंपाच्या इंजिनाचा एक पट्टा या बाजूला लावला की पाणी शेतात येते आणि त्या बाजूला लावला की शालीमधून तांदूळ निघतात. म्हणजे नुसता पट्टा बदलाण्यानेच एवढा फरक पडतो. आधी हेतू निश्चित