________________
पैशांचा व्यवहार
८३
करायचा आहे आणि नंतर तो हेतू पूर्णपणे आपल्या लक्षात राहायला हवा. बस, दुसरे काहीच नाही. लक्ष्मीत लक्ष गुंतलेले नसावे.
प्रश्नकर्ता : लक्ष्मीचा सदुपयोग केला असे केव्हा म्हणता येईल?
दादाश्री : लोकांच्या उपयोगासाठी (जनहितार्थ) किंवा देवासाठी वापरली तर तो लक्ष्मीचा सदुपयोग केला म्हणता येईल.
प्रश्नकर्ता : लक्ष्मी टिकत नाही, तर काय करावे?
दादाश्री : लक्ष्मी टिकेल अशी नाहीच. पण तिचा रस्ता बदलून टाकायचा. दुसऱ्या गैरमार्गाने जात आहे तर तिची दिशा बदलून टाकायची आणि धर्माच्या मार्गाकडे तिचा प्रवाह वळवायचा. जितकी सन्मार्गाकडे वळली तेवढी वाचली. देव आले की मग लक्ष्मीजी टिकणार, त्या खेरीज लक्ष्मी कशी टिकणार?
पैसा चुकीच्या मार्गाने जाऊ लागला तर कंट्रोल करायचा आणि जर सन्मार्गाने खर्च झाला तर डीकंट्रोल करायचा.
हा भाऊ कोणाला तरी दान देत असेल, तिथे कुणी बुद्धीवंत म्हणाला की 'अरे, याला का देतोय? तेव्हा हा म्हणेल, अहो देऊ द्या ना! हा गरीब आहे.' असे म्हणून तो दान देतो आणि तो गरीब दान घेतो. पण तो बुद्धीवंत मघेच बोलला त्याचा त्याला अंतराय पडला. त्यायोगे मग त्याला दु:खाच्या काळात कुणी दाता मिळणार नाही.
(७)
दानाचा प्रवाह
आता तर आपण पश्चाताप करून सर्वकाही पुसून टाकू शकतो. आणि मनात निश्चय केला की परत असे बोलू नये आणि हे जे बोललो, 'त्याची क्षमा मागत आहे.' तर ते पुसले जाईल. कारण अजून ते पत्र पोस्टात पडले नाही, त्यापूर्वीच आपण मजकूर बदलून टाकला की पूर्वी