________________
पैशांचा व्यवहार
आम्ही मनात असा विचार केला होता की 'दान देऊ नये' पण ते चुकीचे आहे. तेव्हा आता आम्ही विचार करीत आहोत की 'दान देणे हे चांगले आहे.' म्हणजे पूर्वीचे सर्व पुसले जाईल.
संकटाच्या वेळी फक्त धर्मच मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून धर्माच्या प्रवाहात लक्ष्मीजींना जाऊ द्या.
__ पैशाचा स्वभाव कसा असतो? चंचल असतो, त्यामुळे येतो आणि एक दिवस परत निघून जातो. म्हणून पैशाचा उपयोग लोकांच्या हितासाठी करावा. जेव्हा तुमच्या वाईट कर्मांचा उदय आला असेल तेव्हा लोकांना जे दिले असेल तेच तुम्हाला मदत करेल. म्हणून आधीच समजून जावे. पैशांचा सद्व्यय (सदुपयोग) तर करायलाच पाहिजे ना?
चार प्रकारचे दान आहेत,
एक आहार दान, दुसरे औषधदान, तिसरे ज्ञानदान आणि चौथे अभयदान.
ज्ञानदानात पुस्तके छापून घ्यावीत, जी लोकांना सन्मार्गी वळवतील आणि लोकांचे कल्याण करतील अशी पुस्तके छापून घ्यावीत, ते झाले ज्ञानदान. ज्ञानदान करणारा चांगल्या गतीत, वरच्या गतीत जातो किंवा मोक्ष सुद्धा मिळवतो.
म्हणून ज्ञानदान ही मुख्य गोष्ट आहे असे भगवंतांनी सांगितले. आणि जिथे पैशांची गरज नाही तिथे अभयदान सांगितले आहे. जिथे पैशांची देवाण-घेवाण असते तिथे ज्ञानदान सांगितले आहे आणि साधारण स्थिती, नरम स्थितीच्या माणसांसाठी औषधदान आणि आहारदान, हे दोन सांगितले आहेत.
आणि चौथे अभयदान. अभयदान म्हणजे काय? तर कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही असे वर्तन ठेवायचे, ते अभयदान.
__ प्रश्नकर्ता : हल्लीच्या काळात दोन नंबरचा पैसा धर्मात वापरला जातो तर त्यामुळे लोकांना पुण्योपार्जन होते काय?