________________
पैशांचा व्यवहार
६९
तुला कुणी फसविणारा भेटला तर तू निसटून जाण्याचा प्रयत्न करतोस ? पण मला तर निसटता सुद्धा येत नाही. तात्पर्य असे की तुमची फसवणूक कोण, कुठपर्यंत करेल ? तर जोपर्यंत तुमच्या खात्यात त्याचा हिशोब बाकी आहे, देण्या-घेण्याचा हिशोब बाकी आहे, तोपर्यंतच तुम्हाला फसवू शकेल. माझ्या खात्याचे सगळे हिशोब पूर्ण झाले आहेत. मध्यंतरी तर मी लोकांना इथपर्यंत सांगत होतो की बाबा, ज्यांनाही पैशाची अडचण असेल, त्याने मला एक थप्पड मारायची आणि पाचशे रुपये घेऊन जायचे.
तेव्हा ते लोक म्हणायचे, 'नको रे बाबा, या अडचणीत तर मी कसेही दिवस काढीन, पण तुम्हाला थप्पड मारली तर माझी काय अवस्था होईल ? आता ही गोष्ट सर्वांना सांगता येणार नाही, काही डेव्हलप माणसांनाच ही गोष्ट सांगू शकतो.
म्हणजे काय, की जगात कुणीही तुला फसविणारा नाही. जगाचा तू मालकच आहेस. तुझ्यापेक्षा वरिष्ठ ( वरचढ ) कुणी नाही. खुदा एकटाच तुझा वरिष्ठ आहे. पण तू जर खुदला (स्वतःला ) ओळखले ना, तर मग तुझा वरिष्ठ कुणीच राहिला नाही. मग कोण फसविणार आहे वर्ल्डमध्ये ! कुणी आपल्याला किंचितही त्रास देऊ शकत नाही. पण पाहा ना, किती मोठी फसवणूक झाली आहे ती !
म्हणून 'मामाने माझी फसवणूक केली, ' हे डोक्यातून काढून टाक. आणि व्यवहारात कुणी विचारले तर असे नाही म्हणायचे की पूर्वी मी त्यांना फसविले होते म्हणून त्यांनी मला फसविले! कारण हे विज्ञान लोकांना माहित नाही, त्यामुळे लोकांना त्यांच्या भाषेतच सांगायला हवे की ‘मामांनी असे केले.' पण आपल्या मनात समजून असावे की ‘यात माझीच चूक होती.' दादा सांगत होते तेच राईट आहे. आणि गोष्ट पण खरीच आहे ना, कारण मामा सद्या तरी भोगत नाही, ते तर मोटार आणून मजेत फिरतात. निसर्ग जेव्हा त्यांना पकडेल तेव्हा त्यांचा गुन्हा सिद्ध होईल. आज तर निसर्गाने तुला पकडले आहे ना !
दुकानात गेलो नाही तर दुकान नाराज होते. दुकान खुष असेल तर चांगली कमाई होते, तसेच इथे सत्संगासाठी पाच मिनिटे, जास्त वेळे