________________
७०
पैशांचा व्यवहार
नसेल तर पाच-दहा मिनिटांसाठी येऊन दर्शन घेऊन जा, जोपर्यंत आम्ही इथे आहोत, तोपर्यंत! हजेरी तर द्यायलाच हवी ना! ।
म्हणजे हा दादांचा तर ब्लॅन्क चेक, कोरा चेक म्हणायचा. हा काही पुन्हा-पुन्हा वटवण्यासारखा नाही. खास अडचण आली तरच साखळी ओढायची. सिगरेटचे पाकीट पडले आणि आपण जर गाडीची साखळी ओढली, तर दंड झाल्याशिवाय राहील काय? म्हणजे असा दुरुपयोग करू नये.
प्रश्नकर्ता : अलीकडे टॅक्स इतके वाढले आहेत की चोरी केल्याशिवाय मोठ्या धंद्यात संतुलन राहत नाही. सगळ्यांनाच लाच हवी, तर त्यासाठी चोरी तर करावीच लागते ना?
दादाश्री : चोरी ठीक आहे पण नंतर तुम्हाला पश्चाताप होतो की नाही? पश्चाताप झाला तरीही ते (कर्म) हलके होऊन जाईल.
प्रश्नकर्ता : तर मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे?
दादाश्री : जिथे आपल्याला असे वाटते की हे चुकीचे (काम) होत आहे, तिथे आपण हार्टिली पश्चाताप करायला पाहिजे. दु:ख वाटायला हवे, तरच सुटका होईल. आता काळ्या बाजारातून माल खरेदी करून आणला तर तो काळ्या बाजार भावानेच विकावा लागणार. तेव्हा मग चंदुलालला सांगायचे की तुम्ही 'प्रतिक्रमण करा.' होय, पूर्वी प्रतिक्रमण करीत नव्हतो म्हणून तर कर्माचे तळे साठले. आता प्रतिक्रमण केले, म्हणजे (हिशोब) चोख होऊन जाईल. जर लोखंड काळ्याबाजारात विकले, तर आपण चंदुलालला सांगायचे, "चंदुलाल, विकले त्यास हरकत नाही, ते 'व्यवस्थित'च्या आधीन आहे. पण त्याचे आता प्रतिक्रमण करा. आणि म्हणा, की परत असे घडता कामा नये."
जर एखाद्या माणसाने मला सांगितले की, 'मला धर्म नको आहे. मला भौतिक सुख पाहिजे.' त्याला मी सांगेन, 'प्रामाणिक रहा, नीतिचे पालन कर.' त्याला मी देवळात जा असे नाही सांगणार. तू जे काही दुसऱ्यांना देतोस तो देवधर्म आहे. पण दुसऱ्याचे बिनहक्काचे घेत नाहीस,