________________
पैशांचा व्यवहार
७१
तो मानवधर्म आहे. अर्थात प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा धर्म आहे. 'डिसऑनेस्टी इज द बेस्ट फूलिशनेस!' (अप्रामाणिकता हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे) पण जर ऑनेस्ट राहता येत नाही, तर काय मी समुद्रात उडी घेऊ? माझे दादाजी शिकवतात की डिसऑनेस्ट झालास तर, त्याचे प्रतिक्रमण कर. तुझा पुढील जन्म उजळेल. डिसऑनेस्टीला डिसऑनेस्टी समज आणि त्याचा पश्चाताप कर. पश्चाताप करणारा माणूस ऑनेस्ट आहे, हे निश्चित आहे.
अनीतिची कमाई करतो, हे सर्व आहे, तर त्यावर उपाय कोणते ते मी सांगितले आहेत, की अनीतिने जर पैसे मिळविले असतील तर रात्री 'चंदुलाल'ला काय सांगावे की सतत प्रतिक्रमण करीत राहा. अनीतिची कमाई का केली? म्हणून आता प्रतिक्रमण कर. रोज चारशे-पाचशे प्रतिक्रमण करायला लावा. स्वतः शुद्धात्म्याने करायचे नाही. 'चंदुलाल'ला करायला लावायचे. ज्याने अतिक्रमण केले त्याच्याकडून प्रतिक्रमण करवून घ्यायचे.
आता भागीदाराबरोबर मतभेद झाला, तर ते लगेच तुमच्या लक्षात येते की जरा जास्तच बोलून गेलो. मग लगेचच त्याच्या नावाचे प्रतिक्रमण करायचे. आपले प्रतिक्रमण कॅश पेमेन्ट सारखे(नकद) असले पाहिजे. ही बँक सुद्धा कॅश म्हणायची आणि पेमेन्ट सुद्धा कॅश म्हणायचे.
या संसारात अंतराय कसे पडतात, ते तुम्हाला समजावून सांगतो. आपण ज्या ऑफिसमध्ये नोकरी करता, तिथे आपल्या आसिस्टन्टला (सहाय्यकाला) बेअक्कल म्हणालात, तर त्यामुळे तुमच्या अकलेवर अंतराय पडला! समजले! सारे जग अंतरायात अडकून मनुष्य जन्म वाया घालवत आहे. तुम्हाला अधिकारच नाही, समोरच्याला बेअक्कल म्हणायचा. तुम्ही असे बोलता म्हणून समोरचा सुद्धा उलट बोलतो, त्यामुळे त्यालाही अंतराय पडतो! बोला, आता या जगात अंतरायाची परंपरा कशी थांबेल? तुम्ही कुणाला नालायक म्हटले, तर तुमच्या लायकीवर पडला अंतराय! तुम्ही जर त्याचे लगेचच प्रतिक्रमण केले तर तो अंतराय पडण्यापूर्वीच धुतला जातो.