________________
७२
पैशांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : नोकरीचे कर्तव्य निभावताना मी फार कडकपणे लोकांना अपमानित केले होते, लोकांना झिडकारले होते.
दादाश्री : त्या सर्वांचे प्रतिक्रमण करायचे. त्यात तुमचा हेतू वाईट नव्हता, तुम्ही स्वत:साठी नव्हे, तर सरकारसाठी ते सर्व केले. म्हणून ती सिनसियारीटी म्हणायची.
(५) लोभामुळे थाटला संसार जी वस्तू प्रिय वाटत असेल त्यात मूर्छित राहणे, याचे नाव लोभ. ती वस्तू मिळाली तरी संतोष वाटत नाही. लोभी माणूस तर, सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत लोभातच अडकलेला असतो. सकाळी उठल्यापासून लोभाची गाठ जसे दाखविल तसे तो करत राहतो. लोभी हसण्यात सुद्धा वेळ घालवित नाही. दिवसभर लोभाच्याच नादात असतो. मार्केटमध्ये पाय ठेवला, तेव्हापासून लोभ. नुसता लोभ, लोभ, लोभ, लोभ ! कारणाशिवाय दिवसभर हिंडत राहतो. लोभी माणूस भाजीमार्केटमध्ये गेला की त्याला माहितच असते या बाजूला महाग भाजीपाला मिळतो आणि त्या बाजूला स्वस्तात ढीग विकले जातात. तर मग स्वस्तातले ढीग शोधून काढतो आणि मग रोज त्याच बाजूला भाजी घ्यायला जातो.
लोभी माणूस भविष्यासाठी सर्वकाही गोळा करतो. मग जेव्हा फार गोळा झाले, की दोन भले मोठे उंदिर घुसतात आणि सर्वकाही साफ करून टाकतात.
लक्ष्मी गोळा करण्याची इच्छा न बाळगात जमा करावी. लक्ष्मी येत असेल तर तिला रोखू नये, आणि येत नसेल तर चुकीच्या मार्गाने ओढू नये.
लक्ष्मी तर स्वतः येण्यासाठी तयारच असते. ती काही आपण संग्रह केल्याने संग्रहित होत नाही! असे नाही, की आज लक्ष्मीचा संग्रह करून ठेवला, आणि पंचवीस वर्षानंतर, मुलीच्या लग्नासाठी वापरण्यापर्यंत ती