________________
पैशांचा व्यवहार
टिकून राहील. त्या गोष्टीत काही तथ्य नाही. जर कुणी असे मानत असेल, तर ती अगदी चुकीची समज ठरेल. हे तर त्यादिवशी जे पदरी पडेल ते खरे. फ्रेश असायला हवे.
७३
म्हणून ज्या वस्तू मिळतील त्याचा उपयोग करा, फेकू नका. सन्मार्गी वापरा. फार साठवून ठेवायचा मनसुबा ठेवू नका. साठवून ठेवायचे असेल तर त्याचा काही नियम असावा की बाबा, आपल्याजवळ, इतकी पुंजी असायला हवी. मग तितकी पुंजी जमा ठेवून, उरलेले योग्य जागी वापरावे. लक्ष्मी फेकून देण्यासाठी नसते.
लोभाचा प्रतिपक्ष शब्द आहे संतोष. पूर्वजन्मी थोडेफार ज्ञान समजले असेल, आत्मज्ञान नाही, पण संसारी ज्ञान समजले असेल, त्याला संतोष उत्पन्न होतो. आणि जोपर्यंत हे समजले नसेल तोपर्यंत लोभातच जगत असतो.
अनंत जन्मांपर्यंत स्वतःने बराच उपभोग घेतलेला असतो त्यामुळे त्याला त्याचा संतोष वाटतो की मला आता काहीच नको. आणि ज्याने उपभोग घेतला नसेल त्याला कितीतरी प्रकारचे लोभ चिकटतात. त्याला मग सारखे वाटत राहते की 'याचा उपभोग करू, त्याचा उपभोग करू' असे वाटत राहते.
प्रश्नकर्ता : लोभी मनुष्य थोडा कंजूष पण असतो, नाही का ?
दादाश्री : नव्हे. कंजूष पुन्हा वेगळे, कंजूष तर, स्वतः जवळ पैसा नाही म्हणून कंजूषपणा करतो. पण लोभी कसा असतो, तर घरात पंचवीस हजार असले तरी, कुठून गहू, तांदूळ स्वस्तात मिळू शकतील, कुठून तूप स्वस्त मिळेल, हेच शोधत राहतो सगळीकडे. त्याचे चित्त लोभातच गुंतलेले असते. मार्केटमध्ये गेला तर तिथे सुद्धा स्वस्तात भाजीपाल्याचे छोटे वाटे कुठे मिळतील तेच शोधत असतो.
लोभी कुणाला म्हणायचे, तर प्रत्येक बाबतीत तो जागृतच असतो ! प्रश्नकर्ता : लोभी आणि कंजूष यांच्यात नेमका फरक काय ? दादाश्री : कंजूष फक्त लक्ष्मीच्या बाबतीच असतो. लोभी तर सर्व