________________
पैशांचा व्यवहार
बाबतीत लोभातच गुंतलेला असतो. मानासाठी पण लोभ करतो, आणि लक्ष्मीसाठी पण लोभ करतो. या लोभी माणसाला तर सर्व दिशांनी लोभ घेरुन असतो. सगळीकडून ओढून नेतो.
प्रश्नकर्ता : लोभी बनणे की काटकसरी ?
दादाश्री : लोभी असणे हा गुन्हा आहे, काटकसर करणे हा गुन्हा
७४
नाही.
'इकोनोमी' म्हणजे काय ? टाईट असेल तेव्हा टाईट आणि थंड असेल तेव्हा थंड. कधीही कर्ज काढून कार्य करू नये. कर्ज काढून व्यापार करू शकतो. परंतु ऐशोआरामासाठी कर्ज काढू नये. कर्ज काढून केव्हा खायचे? ज्यावेळी माणूस मरणाला टेकलेला असतो तेव्हा, नाहीतर कर्ज काढून तूप खाऊ नये.
प्रश्नकर्ता: दादा कंजूषी आणि काटकसरमध्ये काय फरक आहे ?
दादाश्री : फार मोठा फरक ! हजार रुपये महिना कमावत असाल तर आठशेचा खर्च करायचा, आणि पाचशे मिळत असतील तर चारशेचा खर्च करायचा, त्याला म्हणतात काटकसर. जेव्हा की कंजूष तर चारशे म्हणजे चारशेच वापरणार, मग जरी हजार मिळवत असेल किंवा दोन हजार. तो टॅक्सीने जाणार नाही. काटकसर हे तर इकॉनोमिक्स - अर्थशास्त्र आहे. काटकसरी तर भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करतो. कंजूष माणसाला बघितल्यावर समोरच्याला राग येतो की कंजूष आहे. पण काटकसर करणाऱ्याला बघून राग येत नाही.
घरात काटकसर कशी असावी? तर आपले बाहेर वाईट दिसू नये अशी असावी. काटकसर स्वयंपाकघरात शिरता कामा नये. तिथे उदार काटकसर करावी. स्वयंपाकघरात काटकसर घुसली तर मन बिघडते. कुणी पाहुणा आला तरी मन बिघडते की इतके तांदूळ संपतील! कुणी पैसे उधळत असेल तर आम्ही त्याला सांगतो की 'नोबल' काटकसर करा.
पैसे कमविण्याची भावना करायची गरज नाही. प्रयत्न सुरु असेल त्यास हरकत नाही. पण भावना बाळगल्याने काय होते ? 'मी पैसे खेचून