________________
पैशांचा व्यवहार
७५
घेऊ' तर समोरच्याच्या वाट्याला काही येणार नाही मग! म्हणून निसर्गाने जो क्वोटा निर्माण केला आहे तो तसाच राहू द्या ना! लोभ म्हणजे काय? तर दुसऱ्याचे हिसकावून घेणे. मग कमाईची भावना करण्याची गरजच काय? मरणार आहे त्याला मारण्याची भावना करण्याची काय गरज? हे मी सांगू इच्छितो. लोक कितीतरी पापकर्मातून वाचतील या एका वाक्याने ! असे माझे म्हणणे आहे.
लोभवृत्तिमुळे जे आचरण घडते ते आचरणच त्याला पशूयोनीत घेऊन जाते.
तुम्ही सज्जन माणूस आहात आणि तुमची फसवणूक नाही झाली तर दुसऱ्या कुणाची होईल? नालायकाची तर फसवणूक होणार नाही. त्याच्या बाबतीत तर 'सापाच्या घरी साप गेला, आणि जीभ चाटून परत आला' असा थाट होणार! फसवणूक झाली तरच आम्ही खानदानी म्हटले जाऊ ना. आपल्याला जो ‘यावे, बसावे' म्हणून आदर सत्कार मिळतो ना, हे तर त्याचे प्रिपेमेन्ट असते.
म्हणून 'लोभ्याकडून फसविले जावे' असे लिहीले आहे. कारण फसविले जाऊन मला मोक्ष गाठायचा आहे. मी येथे पैसे जमा करण्यासाठी जन्माला आलो नाही. आणि मला हेही माहित आहे की तो नियमाच्या आधीन मला लुबाडत आहे की अनियमाने? मी हे सर्वकाही जाणून आहे, त्यामुळे मला काही हरकत नाही.
माझी फसवणूक भोळेपणामुळे झाली नव्हती. मला माहित होते की हे सर्व माझी फसवणूक करीत आहेत. मी जाणून-बुझून स्वत:ला फसवून घेतो. भोळेपणामुळे जो फसविला जातो, तो तर वेडा ठरतो. आम्ही काही भोळे असू शकतो? जो जाणूनबुझून स्वत:ची फसवणूक करवून घेतो, तो कधी भोळा असू शकेल काय?
आमचे भागीदार एकदा मला म्हणाले, 'तुमच्या भोळेपणाचा लोक फायदा घेतात.' तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, 'तुम्ही मला भोळा समजता, म्हणजे तुम्हीच भोळे आहात. मी तर जाणून-बुझून फसवणूक होऊ देतो.' तेव्हा ते म्हणाले की 'या पुढे मी तुम्हाला असे बोलणार नाही.'