________________
६८
पैशांचा व्यवहार
थोड्या-थोड्या वेळाने टक्कर होईल की काय, असे वाटते, पण टक्कर होत नाही. सगळ्यांचीच काय टक्कर होते? म्हणजे ज्या जागी घाव होतो त्या जागीच तो घाव भरतो सुद्धा. म्हणून जागा बदलू नका. शिवाय नियम सुद्धा हाच आहे.
आपल्यात ज्या ज्या प्रकारच्या शक्ति असतील त्या वापरुन आपण लोकांना ऑब्लाइज(परोपकार) करावे, कोणत्याही प्रकारे समोरच्या माणसांना, सर्वांना, सुखी करावे. आपण सकाळी ठरवायचे की मला जो कुणी भेटेल, त्याला काही ना काही सुख द्यायचे आहे. पैसे देऊ शकत नाही तर इतर अनेक मार्ग आहेत. त्यांना योग्य समज देऊ शकतो, अडचणीत सापडलेल्या व्यक्तिला धीर देऊ शकतो आणि पैसे सुद्धा, पाच-पन्नास रुपये तरी देऊ शकतो ना!
जो जितक्या जबाबदारीने परक्याचे करतो, तो स्वत:चेच करतो. प्रश्नकर्ता : परक्याचे करतो, तो स्वत:चचे करतो. ते कसे ?
दादाश्री : सर्व आत्मा एकसारख्या स्वभावाचेच आहेत. त्यामुळे जो परक्याच्या आत्म्यासाठी करतो, ते स्वत:च्या आत्म्यालाच पोहोचते. आणि दुसऱ्याच्या देहाची सेवा करतो, ती पण पोहोचते. हे खरे, की जो केवळ आत्म्यासाठी करतो, ते दुसऱ्या प्रकारे फळाला येते, मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो, आणि निव्वळ देहासाठी करतो तो इथे सुख भोगत राहतो. म्हणजे हा एवढाच फरक आहे.
प्रश्नकर्ता : माझ्या मामांनी मला ज्या धंद्यात अडकविला आहे, हे जेव्हा-जेव्हा आठवते तेव्हा मामांसाठी मनात खूप उद्वेग होतो की असे का केले त्यांनी? मी काय करावे? काही समाधान सापडत नाही.
दादाश्री : असे आहे की, चूक तुझी आहे म्हणून तुझ्या मामाने तुझी फसवणूक केली. जेव्हा तुझी चूक संपेल तेव्हा तुला फसवणारा कुणीही भेटणार नाही. जोपर्यंत तुम्हाला फसविणारे भेटतात तोपर्यंत तुमच्याच चुका आहेत. मला (दादाजींना) का कुणी फसवणारा भेटत नाही? मला तर फसवणूक करून घ्यायची आहे, तरी मला कुणी फसवित नाही. आणि