________________
पैशांचा व्यवहार
८७
(८)
लक्ष्मी आणि धर्म मोक्षमार्गात दोन वस्तू नसाव्यात. ते म्हणजे स्त्रीसंबंधी विचार आणि लक्ष्मीसंबंधी विचार. जिथे स्त्रीचा विचार सुद्धा आहे, तिथे धर्म तर नाहीच आणि लक्ष्मीचा विचार सुद्धा आहे, तिथेही धर्म नाही. या दोन मायांच्या आधारावर तर हे जग टिकून आहे. हो, म्हणून तिथे धर्म शोधणे हे चुकीचे आहे. तर सद्या लक्ष्मीशिवाय किती केंद्र चालत आहेत?
आणि तिसरे काय? तर सम्यक् दृष्टी असली पाहिजे.
तात्पर्य, लक्ष्मी आणि स्त्रीसंबंध असेल, तिथे थांबू नये. गुरु करायचे तर नीट तपासून करा. लीकेज असेल अशा व्यक्तिला गुरु पद देऊ नये.
ज्याची भीक सर्व प्रकारे नष्ट झाली असेल, त्याला ज्ञानीचे पद मिळते. ज्ञानीपद केव्हा मिळते? तर सर्व प्रकारची भीक संपते तेव्हाच! किती प्रकारची भीक, लक्ष्मीची भीक, कीर्तिची भीक, विषयभोगाची भीक, शिष्यांची भीक, मंदिर बांधण्याची भीक, सर्व भीक, भीक आणि भीकच आहे.
एक माणूस मला विचारतो, 'यात दुकानदाराचा दोष की ग्राहकचा दोष? मी म्हटले, 'ग्राहकांचा दोष!' दुकानदार तर कोणतेही दुकान उघडून बसेल, पण आपण समजायला नको का?
संत पुरुष, तर कधी पैसे घेतच नाहीत. समोरचा दु:खी आहे म्हणून तर तो तुमच्याजवळ आला, आणि उलट तुम्ही त्याच्याकडून शंभर रुपये हिसकावून घेतले. या हिंदुस्तानला खलास केले असेल तर या अशा संतांनी! संत तर कुणाला म्हणायचे की जे आपले सुख दुसऱ्यांना देतात. सुख घेण्यासाठी आलेले नसतात.
आपला हा संघ इतका चोख आहे की मी (दादाजी) तर माझ्या घरचे धोतर आणि कपडे वापरतो. संघाचे वापरले असते तर चारशेचारशेही मिळतात ना? अरे, मी घेत नाही इतकेच नव्हे, तर या (नीरू)