________________
पैशांचा व्यवहार
ताई सुद्धा घेत नाहीत! ह्या ताई पण माझ्याबरोबर राहतात आणि कपडेही स्वत:च्या घरचेच वापरतात. ___या दुनियेत जितके तुम्ही स्वच्छ असाल तितकी दुनिया तुमची! तुम्ही मालक आहात या जगाचे! सव्वीस वर्षांपासून मी या देहाचा मालक झालो नाही. त्यामुळे आमची संपूर्ण स्वच्छता असते! म्हणून पूर्णपणे स्वच्छ व्हा, स्वच्छ!
स्वच्छता म्हणजे या जगातल्या कोणत्याही वस्तूची ज्याला गरजच नसते, भीकारीपणाच नसतो!!
अजून सुद्धा पश्चाताप केला, तर याच देहात राहून पापं भस्मीभूत करू शकाल. पश्चातापाचेच सामायिक करा. कसले सामायिक ? पश्चातापाचे सामायिक, कशाचा पश्चाताप? तर म्हणे, मी लोकांकडून चुकीचे पैसे घेतले. तर ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले त्यांचे नाव घेऊन, त्यांचा चहेरा स्मरून, व्यभिचार इत्यादि केला असेल, नजर बिघडवली असेल वगैरे सर्व पापं धुवायची असली तर अजून सुद्धा धुवू शकता.
लोकांचे कल्याण तर केव्हा होईल? आपण अगदी शुद्ध-स्वच्छ झालो तर! प्योरिटीच सर्वांना, सर्व जगाला आकर्षित करते! प्योरिटी !!! प्योर वस्तू जगाला आकर्षित करते. इम्प्योरिटी जगाला फंक्चर करते. म्हणून प्योरिटी आणा!
जय सच्चिदानंद