________________
पैशांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : त्यात कुणीही सहमत होणार नाही, दादा.
दादाश्री : तर मग ते उपयोगाचे नाही. सर्वांनी मिळून ठरवायला हवे. जर ते दोनशे वर्षांच्या आयुष्याचे एक्स्टेशन मिळवून देत असतील, तर आपण चार शिफ्ट चालू करू.
प्रश्नकर्ता : पण आता धंदा केवढा वाढवायला पाहिजे?
दादाश्री : धंद्याचा व्याप एवढा असावा की आपल्याला निवांत झोपता येईल. जेव्हा आपल्याला बंद करायचा असेल तेव्हा बंद करता येईल, असे असले पाहिजे. धंदा वाढवून-वाढवून नसती दगदग ओढावून घ्यायची नाही.
या ग्राहक आणि दुकानदाराचा संबंध तर असतोच ना? व्यापाऱ्याने दुकान बंद केले तर काय ते संबंध तुटून जातील? नाही तुटत. ग्राहक तर आठवण काढणारच की 'ह्या व्यापाऱ्याने माझ्याबरोबर असा व्यवहार केला होता, असला खराब माल मला दिला होता.' लोक तर वैरभावना लक्षात ठेवतात. मग जरी या जन्मी तुम्ही दुकान बंद केले पण मग पुढच्या जन्मी तो तुम्हाला सोडणार काय? नाही सोडणार. वैराची वसुली करूनच सोडणार. म्हणूनच भगवंतांनी सांगितले आहे की, 'कोणत्याही उपायाने वैर सोडा.' आमचे एक परिचित पैसे उसने मागून घेऊन गेले, आणि मग पैसे परत करायला आलेच नाहीत. तेव्हा आम्ही समजून गेलो की हा वैराचा हिशोब असेल, तर भले घेऊन जाऊ दे, एवढेच नव्हे तर आम्ही त्यानां सांगितले की, 'आता तू आम्हाला पैसे परत करू नकोस, त्याची तुला सूट आहे.' म्हणजे पैसे सोडून सुद्धा वैर जर सुटत असेल तर सोडा. मिळेल त्या मार्गाने वैर सोडा, अन्यथा एका माणसाबरोबर जोडलेले वैर भटकंतीचे कारण बनेल. ____ लाखो रुपये गेले तरी आम्ही(दादाजी) जाऊ देतो. कारण शेवटी रुपये जाणार आहेत आणि आम्ही राहणार आहोत. काहीही असो पण आम्ही कषाय होऊ देत नाही. लाख रुपये गेले तर त्यात काय झाले? आपण तर सलामत आहोत.