________________
पैशांचा व्यवहार
४७
एकसारखे म्हणत नाही. समभाव म्हणजे फायद्याच्या ऐवजी तोटा झाला, तरी हरकत नाही, फायदा झाला तरीही हरकत नाही. फायद्याने उत्तेजना होत नाही आणि तोट्याने डिप्रेशन येत नाही. म्हणजे त्याचा परिणाम होत नाही. स्वतः द्वंद्वांतीत झालेला असतो. ____ मी तर धंद्यात तोटा झाला असेल तरीही लोकांना सांगून टाकतो, फायदा झाला तरीही सांगतो! पण लोकांनी मला विचारले तरच, नाहीतर माझ्या धंद्या बद्दल मी बोलतच नाही. कुणी विचारले की, 'तुम्हाला सद्या धंद्यात तोटा झाला आहे, असे ऐकायला मिळते, तर ही गोष्ट खरी आहे काय?' तर तेव्हा मी सांगतो, 'होय, ही गोष्ट खरी आहे का?' आमच्या भागीदारांनी कधी पण अशी आडकाठी घेतली नाही की तुम्ही का असे सांगून टाकता? कारण असे सांगून टाकलेले बरे, जेणे करून लोक आपल्याला उधार देत असतील तर देणार नाहीत. आणि आपले देणे वाढायचे कमी होऊन जाईल. लोक तर काय म्हणतात? अरे, शहाण्या 'असे सांगायचे नसते, नाहीतर लोक व्याजाने पैसे देणार नाहीत. अरे, पण कर्ज तर आपलेच वाढेल ना, म्हणून तोटा झाला तर सरळ सांगून टाकावे की बाबा, आम्हाला तोटा झाला आहे.
नुकसान झाल्यावर उघड करून टाकायचे, जेणे करून स्वत:चे ओझे हलके होईल. नाहीतर आतल्या आत गुदमरत राहिल्याने ओझे जाणवते.
जितक्या अडचणी येतील त्यांना गिळून टाकाव्या. ज्ञान होण्यापूर्वी जेव्हा आम्ही व्यापार करत होतो तेव्हा फार अडचणी आल्या होत्या. त्यातून पार उतरलो तेव्हाच तर हे ज्ञान झाले ना! आमचा मुलगा-मुलगी मृत्यू पावले तेव्हा पेढे खाऊ घातले होते!
आम्ही तर काय करत होतो की धंद्यात एकदम अडचण आली, तर आम्ही कोणालाही सांगत नव्हतो. आणि हीराबांना (दादाश्रींच्या पत्नी) बाहेरुन कळले की धंद्यात अडचण आली आहे आणि जर त्यांनी विचारले की 'धंद्यात तोटा झाला आहे का?' तर आम्ही उत्तर देत होतो की, 'छे! छे! घ्या हे पैसे, पैसे मिळाले आहेत, तुम्हाला पाहिजेत का? त्यावर हीराबा म्हणायच्या की लोक तर म्हणतात तोटा झाला आहे. तेव्हा