________________
पैशांचा व्यवहार
मी सांगायचो, नाही, नाही तसे काही नाही, उलट आम्ही जास्त कमावले आहे. पण ही गोष्ट खाजगीच ठेवा!
आमच्या धंद्यात तोटा झालावर कित्येकांना दुःख होत असे. ते मला विचारायचे की 'किती नुकसान झाले आहे ? फार तोटा झाला का?' तर मी त्यांना सांगायचो की, 'तोटा झाला होता, पण अलीकडे अचानकच एक लाख रुपयाचा फायदा झाला!' असे म्हटल्याने त्यांना शांती वाटते.
हे सर्व तर मी अनुभवाने निष्कर्ष काढले होते. खरेतर व्यवसाय करताना सुद्धा पैशाचा विचार मला येत नव्हता. पैशाचा विचार करीत राहतो, त्या सारखा मूर्ख कुणीच नाही. पैसे तर किती मिळतील हे आपल्या कपाळी लिहिलेलेच असते! आणि तोटा हा सुद्धा लिहिलेलाच असतो. आपण विचार करत नाही तरी पण तोटा येतो की नाही?
धंद्यात कुणी धूर्त माणसे भेटली आणि आपले पैसे उडवू लागली, तर आपण मनात समजून जायचे की आपले पैसे खोटे आहेत, म्हणून आपल्याला अशी माणसे भेटली आहेत. नाहीतर अशी धूर्त माणसे भेटण्याचे कारणच काय? माझ्या बाबतीत पण एकदा असे घडले होते. एकदा खोटा पैसा आला होता. तेव्हा सगळी धूर्त, चालबाज माणसेच भेटली. तेव्हापासून मी ठरवले की आता असे धन नकोच.
धंदा कोणता चांगला की ज्यात हिंसा होत नसेल, कुणालाही आपल्या धंद्यामुळे दुःख होत नसेल. हे तर धान्य विक्रीचा धंदा असेल तर शेरभर धान्यातून थोडसे काढून घेणार. हल्ली तर लोक भेसळ करायला शिकले आहेत. त्यात सुद्धा खायच्या वस्तूमध्ये भेसळ करणारे तर जनावरात जन्म घेतात. चार पाय मिळाले म्हणजे पडणार तर नाही ना? व्यापार धर्माने करा. नाहीतर अधर्म शिरेल.
धंद्यात मन बिघडले तरी फायदा ६६,६१६ होईल आणि मन नाही बिघडले तरीही फायदा ६६,६१६ राहिल, तर मग कोणता धंदा करावा?
धंद्यात प्रयत्न करत राहायचे नंतर, 'व्यवस्थित शक्ति' आपसूकच सर्व जुळवून देईल. तुम्ही मात्र प्रयत्न करत राहा, त्यात कंटाळा करू नका. देवाने सांगितले आहे की सर्वकाही 'व्यवस्थित' आहे. फायदा