________________
पैशांचा व्यवहार
हजाराचा की लाखाचा होणार असेल तर चलाखी केल्याने एक पैसाही वाढणार नाही. उलट चलाखी केल्याने तर पुढच्या जन्माचा नवा हिशोब तयार होईल, हे जास्तीचे!
प्रश्नकर्ता : आपल्याशी कुणी चलाखी करत असेल तर आपण सुद्धा चलाखी करायला हवी ना? हल्ली तर लोक असेच करतात.
दादाश्री : अशा प्रकारेच चलाखीचा रोग लागू होतो ना! पण ज्याला 'व्यवस्थित शक्तिचे' ज्ञान हजर असेल तो धीर धरु शकतो. जर कुणी आपल्याशी चलाखी करायला आला तर आपण काहीतरी उपाय करून मागच्या दाराने निघून जावे, आपण समोर चलाखी करू नये. ____ म्हणजे थोडक्यात सांगायचे तर आंघोळीच्या पाण्यासाठी किंवा रात्री झोपताना गादीसाठी किंवा असल्याच काही वस्तुंसाठी तुम्ही विचार सुद्धा करीत नाही, तरीपण त्या सर्व वस्तू तुम्हाला मिळतात की नाही? तसेच लक्ष्मीच्या बाबतीतही सहज राहावे.
पैसे कमावण्याची भावना करण्याची गरज नाही. प्रयत्न भले असू द्या. भावना केल्याने काय होते की जर पैसे मी खेचून घेतले तर दुसऱ्याच्या वाट्याला येणार नाहीत. म्हणून निसर्गाने जो क्वोटा (हिस्सा) निर्माण केला आहे, तोच राहू द्या ना, मग भावना करायची गरजच काय? असे मी सांगू इच्छितो. लोकांची होणारी पापं तरी बंद होतील. हे मला सांगायचे आहे.
या एका वाक्यातच मोठे सार सामावले आहे, पण जर नीट समजून घेतले तर. असे काही नाही की माझे हे ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे. ज्ञान घेतले नसेल, पण त्याला जर इतके कळले की हे सर्व हिशोबानुसारच (स्वतःचे नशीब) आहे. हिशोबाच्या बाहेर काहीही घडत नाही, म्हणूनच मेहनत करून सुद्धा तोटाच पदरी पडतो तेव्हा आपल्याला नाही का समजत? मेहनत म्हणजे मेहनत, मग मिळायलाच हवे, पण नाही! तसे घडत नाही. तोटा हा सुद्धा होतच असतो ना!
असा भाव करतात त्याची हरकत आहे, दुसरे काही नाही. इतर क्रियांसाठी माझा विरोध नाही. जोपर्यंत खोटे समजत नाही तोपर्यंत खोटे घडतच जाते.