________________
५०
पैशांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : व्यवसायात हेच खरे आहे, हे माहित असूनसुद्धा आम्ही खरी गोष्ट सांगू शकत नाही.
दादाश्री : म्हणजेच व्यवहार हा आपल्या ताब्यात नाही. निश्चय आपल्या ताब्यात आहे. बी पेरणे आपल्या ताब्यात आहे, परंतु फळ मिळविणे आपल्या ताब्यात नाही. म्हणून आपण भावना करावी. चुकीचे घडले तरीपण भावना चांगलीच करावी की असे होऊ नये.
शेठ कुणाला म्हणायचे? तर आपल्या आश्रितांवर कधीही आवाज वाढवून बोलत नसेल त्याला शेठ म्हणायचे. शेठ जर नोकरावर रागवत असेल तर आपण समजून जायचे की हा शेठ स्वतःच असिस्टंन्ट आहे !! शेठजीचा चेहरा तर कधीच बिघडलेला दिसणार नाही. शेठ म्हणजे शेठच दिसायला हवा. तो जर दटावत राहिला, तर सर्वांसमोर त्याची काय किंमत राहणार? मग तर नोकर पण त्याच्या पाठीमागे बोलतील की या शेठजीत काही दम नाही. नुसता दात ओठ खात असतो. जळले, असा शेठ होण्यापेक्षा तर गुलाम होणे परवडेल. एवढे खरे, की समस्यांचे समाधान करण्यासाठी जर तुम्हाला गरज भासली तर मध्यस्थी काही एजन्सी ठेवा. परंतु ओरडण्याचे काम शेठजींनी स्वतः करू नये! नोकरही स्वतःच लढतात, शेतकरीही स्वत:च लढतात, आणि जर तुम्ही शेठ सुद्धा स्वतःच लढत राहिले तर मग व्यापाऱ्यासारखे राहिलेच कुठे? शेठ तर कधीही असे करत नाही. कधी गरज भासली तर मध्ये एजन्सी तयार करा किंवा मध्यस्थी, अशा माणसाची नेमणूक करा की जो त्यांच्या तर्फे लढेल. पण शेठ स्वतः भांडायला येत नाही. नंतर शेठ दोघांमध्ये समाधान घडवून आणतो.
१९३० साली सर्वात मोठा मंदीचा काळ आला होता. त्या काळात शेठ लोकांनी बिचाऱ्या मजूरांचे फार शोषण केले होते. ते आता तेजीचा काळ आल्यावर मजूर शेठच्या नाकी नऊ आणतात. असा हा जगाचा, एकेमेकांचे शोषण करण्याचा रिवाज आहे. मंदीच्या काळात शेठ शोषण करतात आणि तेजीच्या काळात मजूर शोषण करतात. दोघांचीही एका मागून एक अशी पाळी येतेच. म्हणून हे शेठ जेव्हा तक्रार करतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की १९३० मध्ये तुम्ही मजूरांची गय केली नाही म्हणून