________________
पैशांचा व्यवहार
शांती वाटणार नाही, अशांतीच वाटेल. नैतिकतेशिवाय धर्मच नाही. धर्माचा पायाच नैतिकता आहे!
__ आता यात असे म्हणतात, की संपूर्ण नीतिचे पालन होऊ शकेल तर पाळ आणि जर पालन होऊ शकत नसेल, तर नक्की कर की दिवसातून मला तीन वेळा तरी नीतिचे पालन करायचे आहे. आणि नाहीतर नियमात राहून अनीति केली तरी पण ती नीतिच आहे. जो मनुष्य नियमात राहून अनीति करतो, त्यास मी नीतिच म्हणतो. भगवंतांचा प्रतिनिधि म्हणून, वीतरागींचा प्रतिनिधि म्हणून मी सांगत आहे की अनीति सुद्धा नियमात राहून कर, तो नियमच तुला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. अनीति करत आहे की नीति हे महत्त्वाचे नाही, पण नियमात राहून कर. संपूर्ण जगाने जिथे सक्तीने मनाई केली, तिथे आम्ही सांगत आहोत की यास हरकत नाही. तू नियमात राहून कर.
आम्ही तर असे म्हणतो की अनीति कर पण नियमात राहून कर. एक नियम ठेव की, मला इतकीच अनीति करायची आहे, याहून जास्त नाही. दुकानातून रोज दहा रुपयेच जास्त घ्यायचे आहेत, त्याहून जास्त पाचशे रुपये आले, तरीही मी घेणार नाही.
हे आमचे गूढ वाक्य आहे. याचा गुढार्थ लक्षात आला तर काम होऊन जाईल ना! देव पण खुष होतील की परक्या चाऱ्यात तोंड खुपसत आहे तरी पण कसा प्रमाण सांभाळून खात आहे ! नाहीतर परक्या चाऱ्यात तोंड खुपसल्यावर तिथे मग प्रमाणशीरपणा येतोच कुठे?
आपल्या लक्षात येतेय ना? की अनीति करण्यात पण नियम राखा. मी काय म्हणतो, की 'तुला लाच घ्यायची नाही पण तुला पाचशे कमी पडतात, तर तू कुठपर्यंत क्लेश करत राहशील? लोकांकडून, मित्रांकडून उसने पैसे घेतो, त्यामुळे तर तू जास्त जोखीम ओढवून घेत आहेस. म्हणून मी त्याला समजावून सांगतो, की 'बाबा, तू अनीति कर, पण नियमपूर्वक कर.' आता नियमाने अनीति करणारा नीतिवानापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण नीतिवानाच्या मनात एक रोग घुसतो की, 'मी काहीतरी आहे,' तिथे नियमाने अनीति करणाऱ्याच्या मनात असा रोग घुसणारच नाही.