________________
पैशांचा व्यवहार
असतो, की हे टोक की ते टोक, आशेचे महाल निराशा आणल्याशिवाय राहत नाही. संसारात वीतराग राहणे फार कठीण आहे. ती तर आमची (दादाजींची) जबरदस्त ज्ञानकला आणि बुद्धिकला, दोन्हीही असल्यामुळे आम्ही वीतराग राहू शकतो.
पूर्वी एकदा, आमच्या कंपनीत मोठे नुकसान झाले होते. ज्ञान होण्यापूर्वीची ही गोष्ट, तेव्हा आम्हाला रात्रभर झोप येत नव्हती. सारखी चिंता होत राहायची. तेव्हा आतून उत्तर मिळाले की यावेळी या नुकसानीची चिंता कोणाकोणाला होत असेल? मला असे वाटले की माझे भागीदार कदाचित चिंता करीत नसतीलही. मी एकटाच चिंता करीत बसलो आहे. आणि बायको-मुले सर्वच, भागीदार आहेत, पण त्यांना तर काही माहितच नाही. आणि तरी त्यांची गाडी चालत आहे, तर मी एकटाच मूर्ख की ही सर्व चिंता करीत बसलो आहे ! त्यानंतर मग माझी अक्कल ठिकाण्यावर आली.
एकच पक्ष घेऊन बसला आहात? ज्या कोपऱ्यात जगाची माणसे जाऊन बसली आहेत, त्या कोपऱ्यात तुम्ही पण बसले आहात? फायद्याच्याच पक्षात. तुम्ही लोकांच्या विरुद्ध चालावे. लोक फायदा मागतात तेव्हा आपण म्हणावे 'तोटा होऊ दे.' तोटा मागणाऱ्याच्या पदरी कधी चिंता येत नाही. फायदा शोधत राहणारा नेहमी चिंतेतच असतो आणि तोटा पत्करायची तयारी दाखविणाऱ्याच्या पदरी चिंता कधी येत नाही, याची आम्ही गॅरंटी देत आहोत. आम्ही काय सांगतो ते कळतय ना?
धंद्याला सुरुवात केली की माणस मनात अंदाज बांधतो की या कामात निदान चोवीस हजार तर नक्कीच मिळतील! आता जेव्हा फोरकास्ट करतो, तेव्हा पुढे परिस्थिती बदलूही शकते याचा विचार करण्यास मात्र तो विसरतो. सरळ तसेच फोरकास्ट करतो.
थोडक्यात, आम्ही सुद्धा आयुष्यभर कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय केलेला आहे, सर्व प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट केलेले. आणि समुद्रात जेटी सुद्धा बांधलेल्या आहेत. आता तिथे, धंद्याच्या सुरवातीला काय करीत होतो? जिथे पाच लाखाचा फायदा होऊ शकेल असे वाटत असेल, तिथे आधीच मनात ठरवित होतो की लाखभर मिळाले तरी पुरे आहेत. नाहीतर शेवटी बिना