________________
पैशांचा व्यवहार
नफा-नुकसान, इन्कमटॅक्सचे पैसे निघाले, व जेवण खर्च निघाला तरी चालेल. आणि नंतर मिळतात तीन लाख. तर पाहा, मनात केवढा आनंद वाटतो. कारण मानले होते त्यापेक्षा खूप जास्तच मिळाले. नाहीतर चाळीस हजार, गृहीत धरुन बसला आणि मिळाले वीस हजार, तर दु:खी होऊन जातो!!
धंद्याची दोन मुले, एकाचे नाव तोटा आणि दुसऱ्याचे नाव नफा. तोटा नावाचा मुलगा कुणालाही आवडत नाही, पण दोघे एकत्र असतातच. दोघांचाही जन्म झालेलाच असतो. धंद्यात नुकसान होत असेल तर ते दिवसा होते का रात्री?
आपण खूप श्रम घेतले, चोहीकडून काळजी घेतली, तरी काही पदरी पडले नाही, तर आपण समजून घ्यायला हवे की सध्या आपले संयोग बरोबर नाहीत. आता अशा परिस्थितीत जास्त जोर लावला तर उलट नुकसानच होईल, त्यापेक्षा अशावेळी आपण आत्म्याचे काम करून घ्यावे. गेल्या जन्मी हे केले नाही त्यामुळेच तर ही सर्व भानगड झाली. ज्याला आपले ज्ञान मिळाले असेल त्यांची तर गोष्टच वेगळी आहे, पण जरी आपले ज्ञान मिळाले नसेल तरीही, देवाच्या भरोश्यावर आपली नाव आपण सोडतोच ना! त्याला मग काही करावे लागते का? 'जशी देवाची इच्छा' असेच म्हणतात ना? आणि बुद्धीने मापायला गेलो, तर त्याचा कधी मेळच बसणार नाही.
जेव्हा संयोग बरोबर नसतात, तेव्हा लोक कमाई करायला निघतात. खरेतर तेव्हा भक्ति करायला हवी. संयोग बरोबर नसतील अशावेळी काय करायला पाहिजे? आत्म्याचे, स्वत:च्या आत्म्यासंबंधी सत्संग इत्यादी, करत राहायचे. भाजी नसली तर नसू दे, खिचडी पुरते पैसे तरी निघतील ना? असे आहे, की योग असेल तर कमाई होईल, नाहीतर नफ्याच्या बाजारातही तोटा मिळेल, आणि जर योग असेल तर तोट्याच्या बाजारात सुद्धा फायदा होईल. योगायोगाच्या गोष्टी आहेत या साऱ्या!
नफा-नुकसान, काहीही आपल्या ताब्यात नाही. म्हणून नॅचरल एडजस्टमेन्टच्या आधारावर चला. दहा लाख मिळवल्यानंतर एकदम पाच