________________
पैशांचा व्यवहार
पण त्याच्या पुढे गेलात तर काम बिघडते. व्यापार-धंद्यासाठी दहा-पंधरा मिनटे विचार करायला हवा, पण त्याच्या पुढे जाऊन विचारांचे पीळ चढू लागले तर नोर्मालिटीच्या बाहेर गेलात असे म्हटले जाईल, तेव्हा त्यास सोडून द्या. व्यवसायाचे विचार तर येतील पण विचारांच्या गुंत्यात गुंतून राहिलो, तर मग त्याचे ध्यान उत्पन्न होते आणि त्यामुळे चिंता सुरु होते, आणि ही चिंता तर फार नुकसान करणारी आहे.
प्रश्नकर्ता : मनात ठरवलेले असते की आर्तध्यान-रौद्रध्यान करायचे नाही, परंतु दुकान तोट्यातच चालत आहे, त्यामुळे हे असे होतच राहणार ना? काय करणार?
दादाश्री : हे बघ, दुकान तोट्यात चालत आहे. तू तर तोट्यात चालत नाहीस ना? तोटा दुकानाला होत आहे. दुकानदारीचा स्वभावच असा असतो की त्यात तोटा पण होतो आणि नंतर फायदाही होतो. तात्पर्य असे की फायदा तोटा हे चालायचेच !
आम्ही व्यवसायाचे काम सुरु करण्यापूर्वी काय करतो? तर जेव्हा स्टीमर समुद्रात सोडायची असते, तेव्हा भटजीकडून पूजा-पाठ वगैरे सर्व करवून घेतो, सत्यनारायणाची पूजा, दुसरे आवश्यक पूजा-पाठ सुद्धा करवून घेतो. गरज भासली तर स्टीमरची देखील पूजा करतो. नंतर स्टीमरच्या कानात आम्ही सांगतो, 'तुला जेव्हा बुडायचे असेल तेव्हा बुड बाई, आमची तशी इच्छा नाही! आमची इच्छा नाही!!' असे जर बोललो नाही तर मग निस्पृह झालो असेच म्हटले जाईल, मग तर ती बुडून जाईल. आमची इच्छा नाही, असे सांगितले तर त्यामागे आमची शक्ति काम करीत असते. आणि जर बुडाली तर आपल्याला माहितच आहे की आपण कानात सांगितले होतेच ना! आपण नव्हते का सांगितले? म्हणजे एडजस्टमेन्ट घेत राहिलो तरच जगात निभाव लागेल!
मनाचा स्वभाव कसा आहे की मनासारखे झाले नाही की मन निराश होऊन जाते. तसे होऊ नये म्हणून हे सर्व उपाय करायचे. मग सहा महिन्यानंतर बुडेल की दोन वर्षांनंतर, आम्ही तेव्हा एडजस्टमेन्ट घेऊन टाकतो की सहा महिने तरी निभावून नेले. व्यापार म्हणजे कसा