________________
पैशांचा व्यवहार
तशीच ही पैशांची अटकण पडलेली असते, तो सकाळी अंथरुणातून उठला की पैशाचे ध्यान सुरु होते! ही पण एक मोठी अटकण म्हणायची.
प्रश्नकर्ता : पण पैशांशिवाय तर चालत नाही ना?
दादाश्री : चालत नाही, पण पैसे येतात कसे, ते या लोकांना माहित नाही आणि पैशांच्या मागे धाव धाव धावतात. पैसे तर घामासारखे येतात, जसे कुणाला जास्त घाम येतो तर कुणाला कमी येतो. आणि घाम जसा आल्याशिवाय राहत नाही, तसा पैसाही मिळतच असतो ना लोकांना!
मला तर मुळापासूनच पैशांची अटकण नव्हती. बावीस वर्षाचा होतो तेव्हापासून मी व्यवसाय करीत होतो पण तरीही माझ्या घरी जे कुणी येतील त्यांना माझ्या व्यवसायाची माहिती पण नव्हती. उलट मीच त्यांना विचारत असे की 'तुम्हाला काही अडचण वगैरे तर नाही ना?'
पैशांचीच आठवण येणे ही पण जोखीमच आहे, तर त्याची भक्ति करणे, ही तर केवढी मोठी जोखीम?
माणूस एका जागी भक्ति करू शकतो. एक तर पैशांची भक्ति करू शकतो किंवा आत्म्याची. दोन्ही ठिकाणी माणसाचा उपयोग (चित्त केंद्रीत) होऊ शकत नाही. दोन्हीकडे उपयोग कसा राहू शकेल? एका ठिकाणीच राहतो. तेव्हा काय करावे?
एक शेठजी भेटले होते. तसे तर ते लखपती होते. माझ्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते, पण त्यांचे माझ्याशी चांगले पटत होते! त्या शेठजींना मी एकदा विचारले, ही तुमची मुले तर कोट-पॅन्ट घालून हिंडतात आणि तुम्ही फक्त एवढेसे धोतर, ते सुद्धा दोन्ही गुढगे उघडे दिसतील असे का घालता? ते शेठ देवळात दर्शनासाठी निघाले की असे उघडे दिसायचे. एवढीशी धोती-लंगोट मारुन चाललेत असे वाटायचे! एवढीशी बंडी आणि पांढरी टोपी घालून दर्शनासाठी असे धावपळ करताना ते दिसायचे. मी म्हटले, 'मला असे वाटते की ही सर्व संपत्ति तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात?' तर मला म्हणाले, 'नाही घेऊन जाता येत, अंबालाल भाऊ, सोबत नेता येत नाही.' मी म्हटले 'तुम्ही तर हुशार, आम्हा पाटलांना फारशी समज नसते.