________________
पैशांचा व्यवहार
३७
ही वाक्ये तुमच्या दुकानात लिहून ठेवा. (१) प्राप्ताला भोगा. अप्राप्ताची चिंता करू नका. (२) जो भोगतो त्याची चूक. (३) डिसऑनेस्टी इज द बेस्ट फुलीशनेस!
जगात काहीच नाही, असे नाही. सर्व वस्तू आहेत या जगात. पण म्हणतात ना की 'सकल पदारथ है जगमांही, भाग्यहीन नर पावत नाही.' अर्थात जितकी कल्पना करता येईल तितक्या सर्व वस्तू जगात असतात पण तुमचे अंतराय(नशीबाचा अडथळा) असता कामा नये, तर त्या वस्तू तुम्हाला मिळतील.
सत्यनिष्ठा पाहिजे. ईश्वर काही मदत करायला रिकामा नाही. तुमची दानत खरी असेल तेव्हाच तुमचे काम होईल.
लोक म्हणतात, 'खऱ्याला ईश्वर मदत करतो!' पण नव्हे, तसे नाही. ईश्वर जर खऱ्याला मदत करत असेल तर खोट्याचा काय गुन्हा? ईश्वर काय पक्षपाती आहे ? ईश्वराला तर सर्वठिकाणी निष्पक्षपाती राहायला पाहिजे ना? ईश्वर तशी कुणालाही मदत करीत नाही. ईश्वर यात हस्तक्षेप करीतच नाही. ईश्वराच्या नामस्मरणानेच आनंद होतो. त्याचे कारण काय, तर ती मूळ वस्तू आहे. आणि ते स्वतःचेच स्वरुप आहे. म्हणून आठवण होताच आनंदाची अनुभूति होते. आनंदाचा लाभ घडतो. बाकी ईश्वर काही करीत नाही. ते काही देतच नाहीत. आणि त्यांच्यापाशी काही नाहीच, तर देणार काय?
प्रश्नकर्ता : दादाजी, व्यवहार कशा पद्धतीने करावा?
दादाश्री : विषमता होता कामा नये. समभाव ठेऊन निकाल करावा. आपल्याला जिथून काम करवून घ्यायचे आहे, तिथला मॅनेजर म्हणाला की, 'दहा हजार रुपये काढा, तरच तुमचा पाच लाखाचा चेक मिळेल.' आता आपल्या चोख व्यापारात किती फायदा झाला असेल? पाच लाख रुपयात दोन लाख आपल्या घरचे असतील आणि तीन लाख