________________
पैशांचा व्यवहार
इतर लोकांचे देणे असेल, तर आता त्या लोकांना अडकवून ठेवणे हे योग्य आहे का? म्हणून आपण त्या मॅनेजरला समजावण्याचा प्रयत्न करावा की, 'बाबा, धंद्यात मला नफा मिळाला नाही,' असे - तसे सांगून जर पाचपर्यंत तयार झाला तर ठीक नाहीतर शेवटी दहा हजार देऊनही आपला चेक मिळवून घ्यावा. आता तिथे 'मी लाच का देऊ?' असा आग्रह धरुन बसलात तर ज्यांचे पैसे धंद्यात गुंतवले आहेत त्यांना काय उत्तर देणार ? ते सर्व मागणारे तुम्हाला रागाच्याभरात शिव्या देतील ! तेव्हा जरा समजून घ्या. वेळेनुसार मार्ग काढा.
३८
लाच देणे हा गुन्हा नाही. ज्या वेळेस जो व्यवहार येऊन ठेपला, त्या वेळेस एडजस्ट होणे तुला जमले नाही, तर तो गुन्हा ठरेल. आता अशा वेळी कुठपर्यंत सत्याचे शेपूट धरुन बसायचे ? ! तर, जोपर्यंत आपल्याला एडजस्टमेन्ट करून घेता येईल, आपल्याजवळ लोकांचे कर्ज फेडण्याइतकी बँक बॅलेन्स असेल आणि लोक आपल्याला शिव्या देत नसतील, तोपर्यंत धरुन ठेवायचे, पण जर बँक बॅलेन्स कमी पडत असेल आणि पैसे मागणाऱ्यांच्या शिव्या खायची वेळ आली तर काय करावे ? तुम्हाला काय वाटते ?
प्रश्नकर्ता : होय, बरोबर आहे.
4
दादाश्री : मी तर आमच्या व्यापारात सांगत होतो की, 'बाबा, देऊन ये पैसे. आपण जरी चोरी करत नाही की असले - तसले काही गैर करत नाही, तरी पण पैसे देऊनच ये.' नाहीतर लोकांना धक्के खायला लावायचे, हे आपल्यासारख्या भल्या माणसाचे काम नव्हे. अर्थात लाच दिली त्यास मी गुन्हा मानत नाही, परंतु ज्यांनी आपल्याला माल दिला, त्यांना आपण वेळेवर पैसे दिले नाही, तर त्यास मी गुन्हा म्हणतो.
रस्त्यात थांबवून लुटारुंनी पैसे मागितले तर तुम्ही देणार की नाही ? की सत्यासाठी देणार नाही ?
प्रश्नकर्ता : द्यावे लागतात.
दादाश्री : तिथे कसे मुकाट्याने देता ? आणि इथे का देत नाही ?