________________
पैशांचा व्यवहार
असतात! पैसे कमावणे हा काही बुद्धीचा खेळ नाही, की मेहनतीचे फळ सुद्धा नाही. ही तर तुमची पूर्वजन्माची पुण्याई किती आहे त्याच्या फळस्वरुपाने तुम्हाला (पैशांची) प्राप्ती होते. आणि तोटा, हा पूर्वी केलेल्या पापाच्या फळस्वरुपाने असतो. लक्ष्मी पुण्य आणि पापाच्या आधीन असते. म्हणून जर लक्ष्मी हवी असेल तर आपण पुण्य-पापाकडे लक्ष द्यायला हवे.
लक्ष्मीजी तर पुण्यवंतांच्या मागेमागेच फिरत असते, आणि मेहनत करणारे लक्ष्मीजीच्या मागेमागे फिरत असतात. त्यामुळे आपण हे समजून घ्यायला हवे की पुण्य पदरी असेल तर लक्ष्मी आपल्या मागे येईल. अन्यथा मेहनत करून तर भाकरी मिळेल, खायला प्यायला मिळेल आणि एखादी मुलगी असेल तर तिचे लग्न करता येईल. खरेतर पुण्याईशिवाय लक्ष्मी मिळत नाही.
यात खरी हकीकत काय आहे, तू जर पुण्यवान आहेस तर उपद्व्याप कशाला करतोस? आणि जर पुण्यवान नाहीस तरीपण उपद्व्याप कशासाठी करतोस?
पुण्यवंत तर कसे असतात? हे अमलदार दमून भागून घरी परत येतात, तेव्हा बाईसाहेब काय म्हणतात, 'दीड तास उशीर का झाला, कुठे गेले होते?' पाहा हे पुण्यवंत(!) पुण्यवंताची ही अशी स्थिती असते? पुण्यवंताला तर हवेची उलटी झुळूक देखील लागत नाही. लहानपणापासूनच ही क्वॉलिटी (गुणवत्ता) वेगळीच असते! त्यांना अपमानाचा योग येतच नाही. जिथे जातील तिथे 'यावे... यावे स्वागत आहे' अशाच सुयोगात वाढत असतात. आणि याला पाहिले तर इथून धक्का, तिथून बुक्का! याचा अर्थच काय? पुण्याई संपली की परत जसा होता तसाच! अर्थात् तू जर पुण्यवान नाहीस तर रात्रभर पट्टा बांधून फिरत राहिलास, (खूप मेहनत केलीस) तरी सकाळी काय पन्नास रुपये पदरी पडतील? म्हणून धडपड धडपड करू नकोस. आणि जे काही मिळाले त्यात खाऊन-पिऊन शांतपणे झोपून जा ना, म्हणजे झाले !
लक्ष्मी म्हणजे पुण्यवान लोकांचे काम. पुण्याचा हिशोब असा आहे की खूप श्रम करतो आणि कमीत कमी मिळवतो, हे फारच थोडे,